शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

सर्वांगीण विकासासाठी योगाभ्यास करावा  : प्रज्ञा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:08 AM

विद्यार्थ्यांनी लहानपणा-पासूनच ओंकार आणि सूर्यनमस्कारा-सोबत योगाभ्यास मनापासून केल्यास त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होतो. सर्वांगीण विकासा-साठी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करावा, असे प्रतिपादन योगशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण-पदक विजेत्या प्रज्ञा पाटील यांनी केले.

सिन्नर : विद्यार्थ्यांनी लहानपणा-पासूनच ओंकार आणि सूर्यनमस्कारा-सोबत योगाभ्यास मनापासून केल्यास त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास होतो. सर्वांगीण विकासा-साठी विद्यार्थ्यांनी नियमित योगाभ्यास करावा, असे प्रतिपादन योगशास्त्राच्या आंतरराष्ट्रीय सुवर्ण-पदक विजेत्या प्रज्ञा पाटील यांनी केले.  नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सिन्नर संकुलातर्फे आयोजित शतकमहोत्सवी वर्षात एक कोटी सामूहिक सूर्यनमस्कार संकल्पपूर्ती सोहळ्यात त्या बोलत होत्या. संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष श्रीपाद देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर कॅनडा येथील प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी जयंत लेले, दीपाली लेले, प्रकाश पंगम, शालेय समिती अध्यक्ष बापूसाहेब पंडित, श्रीराम क्षत्रिय, प्राचार्य दिलीप वाणी, मुख्याध्यापक यशश्री कसरेकर, सुरेखा जेजुरकर, तोताराम घुगे, अरुणा चोथवे, सुनीता कोथळकर, अनिल पवार, जागृती टिळे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी मान्यवरांच्या हस्ते हनुमानाच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. जयंत लेले यांनीदेखील या उपक्रमाचे कौतुक करत सूर्यनमस्कार ही तुमची जीवनशैली बनावी आणि आपल्या अंत:करणात असलेल्या गुणांना संधीची वाट मोकळी करून देण्यात मदत मिळावी, असे नमूद केले. याप्रसंगी प्रकाश पंगम यांच्या हस्ते गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे मानपत्र संकुलातील सर्व मुख्यध्यापकांना वितरित करण्यात आले. सूर्यनमस्कार हा भारतीय संस्कृतीतील अविभाज्य भाग असून, ही कला जीवनात आचरणात आणावी, असे आवाहन श्रीपाद देशपांडे यांनी केले. यावेळी संकुलातील सुमारे १७०० विद्यार्थ्यांनी दोन आवर्तनात २६ सूर्यनमस्कार मंत्राच्या जयघोषात सादर करत प्रात्यक्षिकातून ४४ हजार २०० सूर्यनमस्कार घालून भगवान सूर्य-नारायणाची वंदना केली. याप्रसंगी अनिल देशपांडे, अनुप्रिता देशपांडे, रेणुका शेलार, जागृती भंडारी, ज्योत्स्ना केदार उपस्थिती होती. माधवी पंडित यांनी सूत्रसंचालन केले, तर तोताराम घुगे यांनी आभार मानले. जागृती टिळे यांनी प्र्रास्ताविक केले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी