शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

योग करा, निरोगी राहाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:49 AM

शहरातील विविध शाळांमध्ये योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके सादर केले.

नाशिक : शहरातील विविध शाळांमध्ये योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके सादर केले.  महाराष्ट्र समाज सेवा संघ उत्साहात साजरा करण्यात आला. मनीषा येवला यांनी वेगवेगळे व्यायाम प्रकार करुन घेतले. प्रमुख पाहुणे अर्चना ओझरकर यांनी योगासनाचे महत्त्व सांगितले. हेमंत पवार यांनी आभार मानले. यावेळी दीपक पवार भगवंत गांवडे, शोभा कोठावदे आदी उपस्थित होते.आठवले जोशी बालविकास मंदिरलोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आठवले जोशी बालविकास मंदिर, मेरी या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन आयुर्वेदाचार्य डॉ. निवोदिता पारख, गोविंदराव यार्दी, जयश्री यार्दी, दिलीप पटेल, सुधाकर नेवे, चित्रा देशपांडे उपस्थित होते. योगदिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांचे योगाभ्यास वर्गाचे प्रात्यक्षिक योगशिक्षिका शर्मिला डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. अर्पिता घारपुरे यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रात्यक्षिक करुन दाखविले. मुख्याध्यापक मोरे यांनी आभार मानले.नवरचना विद्यालयमहाराष्ट्र समाज सेवा संघ संचलित नवरचना विद्यालय शाळेत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन वाल्मीक चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गीता पटेल होत्या. प्रीती चौधरी यांनी विद्यार्थ्यांकडून योगासनाची प्रात्यक्षिके करुन घेतली. पुष्पा चोपडे गीता पटेल यांनी योगाचे महत्त्व समजावून सांगितले. प्रास्तविक मनीषा शिंदे यांनी केले. मुख्याध्यापक माया आचार्य यांनी स्वागत केले. कार्यक्रमास रुपेश सोनवणे, साबळे आहिरे आदीेसह यावेळी शिक्षक उपस्थित होते.महात्मा गांधी विद्यामंदिरजनता सेवा मंडळ संचलित महात्मा गांधी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जनता सेवा मंडळाचे अध्यक्ष  गं. पा. माने संस्थेच्या संचालक सुनंदा माने उपस्थित होते. मुख्याध्यापक आशा जाधव यांनी योग दिनाचे महत्त्व आणि प्राणायाम प्रकार समजावून  सांगितले. ज्येष्ठ शिक्षक कैलास पवार, रत्ना महाले यांनी विद्यार्थ्यांनायोगाचे महत्त्व आणि प्राणायाम  प्रकार समजावून सांगितले.  तसेच त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करुन घेतले.अभिनव बालविकास मंदिरमविप्र संचलित अभिनव बाल विकास मंदिर, इंदिरानगर शाखेत योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्याध्यापक आर. एन. अहिरे यांनी सरस्वतीपूजन करुन योग प्राणायामाचे महत्त्व सांगितले. माधुरी काळे यांनी मार्गदर्शकम्हणून प्रात्यक्षिके करुन दाखविली. आर. एच. अहिरे यांनी प्रास्ताविक केले.  सूत्रसंचालन एस. एन.  पगार यांनी केले. याप्रसंगी एम. जे. पवार, वाय. बी. साळुंके, आर. डी. जाधव, टी. डी. ठाकरे, व्ही. एस. बागुल आदी उपस्थित होते.अशोका युनिव्हर्सल स्कूलजागतिक योग दिनाचे औचित्य साधून अशोक युनिव्हर्सल स्कूलमध्ये योगाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. संगीत उपचार पद्धतीवर कार्यशाळा घेण्यात आली. त्यासाठी मुंबई येथील डॉ. सुजाता सिंगी यांचे संगीत उपचार सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. सुंजाता यांनी योग प्रात्यक्षिक आणि संगीत याचा आरोग्यावर कसा चांगला परिणाम होतो. याबद्दल माहिती सांगितली. या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थी सहभागी झाले होते.के. के. वाघ स्कूलके. के. वाघ एज्युकेशन सोसायटी के. के. वाघ इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज आणि युनिहर्स स्कूलमध्ये योग प्रमुख पाहुणे म्हणुन आंतरराष्ट्रीय निसर्गोपचार संघटनेचे प्रमुख महाराज भगवानदादा ठाकरे, उपाध्यक्ष आयानओचे शिवानंद महाराज उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना योगाचार्य रमाकांत जाधव भारती पाटील, भारती जगताप यांनी योगाचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. प्राचार्य अश्विनी पवार व प्राचार्य अमृतराव यांच्या सहकाऱ्यांनी या योग प्रशिक्षण सहभाग घेतला.आळंदी डॅम शाळेत योगासनेआळंदी डॅम शाळेत आंतरराष्टÑीय योगदिन साजरा करण्यात आला. नेहरू युवा केंद्र, युवा संसद अंतर्गत मैत्रेय सामाजिक उत्क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. राजेश साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक हेमंत धुमणे यांनी विद्यार्थी पालकांसह योगासने केली. गायक संजय आव्हाड यांनी गीते सादर केली. याप्रसंगी सुचित्रा साळुंखे यांच्या हस्ते मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसंरपंच भास्कर बुरंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल वाघमारे, लहानू शेवरे, दौलत बुरंगे, शांताराम माळेकर, संजय टोंगारे, मंगला चारस्कर, हिराबाई बेंडकोळी उपस्थित होते. बुरकूड यांनी आभार मानले.मविप्र पदाधिकाऱ्यांचा मराठा हायस्कूलच्या प्रांगणात योगाभ्यासमविप्र संस्थेतर्फे मराठा हायस्कूलच्या क्रीडांगणावर योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या योगाभ्यास शिबिरात मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, संस्थेचे शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, डॉ. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे, प्राचार्य डॉ. दिलीप डेर्ले, डॉ. विलास देशमुख, प्राचार्य संजय काळोगे, प्राचार्य एम. बी. नरवाडे, मुख्याध्यापक अरुण पवार, क्रीडाधिकारी प्रा. हेमंत पाटील, क्रीडाशिक्षक संजय होळकर आदींनी योगाभ्यासात सहभागी होत वेगवेगळी योगासने केली. पतंजली योग समितीचे योगाचार्य गोकुळ घुगे, संतोष औटी यांनी योगविद्येचे धडे देत उपस्थितांक डून विविध प्रकारची योगासने करून घेतली. यावेळी चार हजार विद्यार्थी, खेळाडू, एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनाही योग शिबिरात सहभाग नोंदविला. नीलिमा पवार यांनी योग आणि प्राणायाम हा भारतीय संस्कृतीचा मोठा ठेवा असल्याचे सांगत निरोगी शरीर व मनासाठी विद्यार्थ्यांनी नियमित योगा करण्याचा सल्ला दिला. दरम्यान, होरायझन अकॅडमीची राष्ट्रीय योगा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू स्वानंदी वालझाडे हिने यावेळी रिदमिक योगाची आकर्षक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची मने जिंकली. यानंतर सहजयोगाचेदेखील प्रात्यक्षिक देण्यात आले.रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये योगदिन साजरारासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग विद्याधामच्या योग प्रशिक्षक आरती पाटील, समद्धी पाटील, योगशिक्षक वृषाली मोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी आसने केली. दररोज योगासने केल्याने आपण उत्साही आणि निरोगी राहतो असे आरती पाटील यांनी मुलांना समाजावून सांगितले.महापालिका शाळा, अंबड४महापालिका शाळा अंबड येथे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी योगाचे प्रात्यक्षिक केले. योगशिक्षक सुनील बोंडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक विनय कवर यांनी योगदिनाचे महत्त्व पटवून सांगितले. याप्रसंगी नीलिमा फलके, राजाराम चौरे, अर्चना बोंडे, मंगला सोनवणे, चंद्रकला बागुल, रुपाली चव्हाण, सुनील सोनवणे, वैशाली क्षीरसागर, भारती गवळी, संजय सानप आदी उपस्थित होते.

टॅग्स :YogaयोगNashikनाशिक