नाशिक : जागतिक पातळीवर योग दिन घोषित करण्यात यश मिळाल्यानंतर आता नाशिकमध्ये योग विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना आमदार सीमा हिरे यांनी निवेदन दिले.भारताची प्राचीन परंपरा असलेल्या योग साधनेचे महत्त्व दिवसेंदिवस महत्त्व वाढते आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नामुळे २१ जून हा योग दिन साजरा करण्यास आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे. तथापि, योग विद्येचे शास्त्रीय धडे देण्यासाठी तशा संस्था निर्माण होण्याची गरज आहे. नाशिकमध्ये योग विद्यापीठासाठी पोषक वातावरण असून, नाशिक-त्र्यंबकरोडवर त्यासाठी प्रशस्त जागा उपलब्ध आहे. त्यामुळे नाशिकमध्ये योग विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी हिरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, गंधार मंडलिक, महेश हिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नााशिकसाठी योग विद्यापीठाची मागणी
By admin | Published: January 23, 2015 11:46 PM