शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नाशिकरोडला जलतरण तलावात महिलांची योगासने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:18 AM

जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले.

नाशिकरोड : जेलरोड येथील कमलावती कोठारी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका सुरेखा बोकडे व योगशिक्षिका ऐश्वर्या यांनी योगाचे महत्त्व सांगितले़ योगाभ्यासात विद्यार्थिनींनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा पगार यांनी केले. यावेळी सुनीता सोनगिरे, सुरेखा पाटील, मानसी झनकर, स्नेहा सोनवणे, प्रणाली आहिरे, योगेश चौरे, शोभा गरुड, रेवती बुरकुले, अरुण काळे उपस्थित होते.उपनगर महाराष्ट हायस्कूलउपनगर येथील महाराष्ट्र हायस्कूलमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश घरटे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी योग शिक्षक आरती जगवानी तसेच शाळेतील शिक्षक तानाजी पाटोळे यांनी योग प्रात्यिक्षके करून दाखिवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरणा साबळे यांनी केले. यावेळी शिक्षक मोनिका चौधरी, चंद्रकांत कुलकर्णी, बाळू चौधरी, सुनील सोनवणे, योगीता साळवे, वृषाली जायभावे, वंदना ठाकूर, बिंदू वाघेला, युवराज दंडगव्हाळ आदी उपस्थित होते.मनपा शाळा ६१देवळालीगाव तेलीगल्ली मनपा शाळा ६१ मध्ये योग शिक्षक रूपेश व नीलेश यांनी योगासने व प्राणायामाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेतली. यावेळी मुख्याध्यापिका सुनंदा गुंजाळ तसेच शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.डॅफोडिल वंडर एज्युकेशनजेलरोड येथील डॅफोडिल वंडर एज्युकेशनल पार्कआणि मानूर येथील आनंद महाराज कॉलेजमध्ये जागतिक योग दिन मुख्याध्यापिका पायल पंजाबी व आनंद महाराज कॉलेजच्या उपप्राचार्या डांगे यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. सुजाता महाले यांनी योगाचे महत्त्व सांगितले. उर्मिला भालेराव यांनी विद्यार्थ्यांना योगाचे प्रकार शिकवले. आभार शिक्षिका वैशाली सूर्यवंशी यांनी मानले.नासाका माध्यमिक विद्यालयातपळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी योग शिक्षक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारची योगासने सादर केली. मुख्याध्यापक शंकर पिंगळे व शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी योग दिनाची माहिती दिली.संत आईसाहेब स्कूलपळसे येथील संत आईसाहेब महाराज इंग्लिश स्कूलमध्ये योग शिक्षक विठ्ठल पवार यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने करून घेत त्यांना योगाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक टी. के. गाडे, एस. व्ही. बोरसे, एम. डी. संधान, बी. के. जाधव, ए. डी. गायखे, श्याम साबळे, विद्या काकळीज आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन बी. के. जाधव यांनी केले.रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियमकाठेगल्ली येथील रंगूबाई जुन्नरे इंग्लिश मीडियम प्रायमरी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, वृक्षासन, ताडासन, गरुडासन अशा विविध योगासनांचे मार्गदर्शन करून त्यांच्याकडून सदर आसने करून घेतली. यावेळी मुख्याध्यापिका कल्याणी अग्निहोत्री यांनी सुदृढ आयुष्याची गुरूकिल्ली म्हणजे योगा असे सांगितले. योग दिनाचे महत्त्व सुजाता पवार यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन पाटील यांनी केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.स्कॉटिश अकॅडमी४जेलरोड येथील स्कॉटिश अकॅडमी शाळेत पतंजली संस्थेच्या सेविका प्रमिला सहाणे, प्रतिभा बोराडे, सीमा वाजे, अलका लोखंडे, पुष्पलता माळवे, छाया गवांदे, ज्योती माळवे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्त्व सांगून विविध आसने करून घेतली. मुख्याध्यापिका रमादेवी रेड्डी यांनी आभार मानले.जलतरण तलावात योगासनेमनपाच्या नाशिकरोड येथील राजमाता जिजाऊ जलतरण तलाव येथे योग दिनानिमित्त महिला जलतरणपटूंनी तलावामध्ये योगासने केली. व्यवस्थापिका माया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व योग शिक्षिका कांता वराडे, ज्योती वराडे यांनी योगासने केली.या उपक्रमात ज्योती जाधव, गीता मंगवाना, मंगला वाघ, स्मिता शिंदे आदी सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :SwimmingपोहणेYogaयोग