शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

नाशकात आप ठप्प, माकपा गप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:46 IST

सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सारे गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : बदलत्या समीकरणांमुळे ‘झाडू’न सारे गायब

नाशिक : सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने निवृत्त शासकीय अधिकाऱ्याला रिंगणात उतरवत आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. यंदा मात्र, आप पूर्णपणे ठप्प असून, बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही ‘झाडू’न सारे गायब असल्याचे चित्र दिसून येत आहे. आपबरोबरच माकपाकडूनही केवळ दिंडोरीचीच चर्चा घडविली जात असून, नाशिकबाबत पक्षनेत्यांनी तूर्त गप्प राहणेच पसंत केले आहे.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सन २०१३ मध्ये अरविंद केजरीवाल या माजी सनदी अधिकाऱ्याने आम आदमी पार्टीची स्थापना करत दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल २८ जागा पटकावल्या होत्या. पूर्ण बहुमत नसल्याने आपने अन्य पक्षांच्या मदतीने दिल्लीत सरकार स्थापन केले परंतु, ते अल्पजीवी ठरले. आपने दिल्लीत मारलेल्या मुसंडीमुळे देशभरात त्याची चर्चा सुरू झाली होती. त्याच बळावर आपने सन २०१४ च्या निवडणुकीत मोठी हवा निर्माण केली होती. त्यातूनच नाशिक लोकसभा मतदारसंघात जलसंपदा खात्यातून मुख्य अभियंता या पदावरून निवृत्त झालेले आणि जलसंपदा खात्यातील सिंचन घोटाळ्याबाबत आरोपांची राळ उठविणारे विजय पांढरे यांना निवडणुकीचे वेध लागले होते. अपेक्षेप्रमाणे विजय पांढरे यांनी नाशिक मतदारसंघात उमेदवारी केलीही परंतु, ९६७२ म्हणजे १.०३ टक्केच मते त्यांच्या पदरात पडू शकली होती. पांढरे यांचा आप सहाव्या क्रमांकावर फेकला गेला होता. गेल्या पाच वर्षांत राज्यात आपचा प्रभाव हळूहळू ओसरत गेला. आता लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असताना आणि अन्य पक्षात उमेदवारीबाबत चर्चा रंगली असताना आप मात्र पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून येत आहे. आपकडून उमेदवारीबाबत कुणाच्याही नावाची चर्चा होताना दिसून येत नाही. त्यामुळे यंदा आपकडून अन्य पक्षालाच ‘पहले आप’ म्हणत पुढे चाल देण्याची शक्यता बळावली आहे.माकपाची संदिग्ध भूमिकाआपप्रमाणेच नाशिक मतदारसंघात माकपातही शांतता आहे. माकपाने केवळ दिंडोरीच्या जागेबाबत आग्रही भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात अ‍ॅड. तानाजी जायभावे यांनी उमेदवारी केली होती. त्यांना १७ हजार १५४ मते मिळविता आली होती. यंदा, नाशिकच्या उमेदवारीबाबत अवाक्षरही काढले जात नसल्याने माकपाच्याही भूमिकेबाबत संदिग्धता आहे. आपने नाशिकप्रमाणेच दिंडोरीतूनही प्रा. ज्ञानेश्वर माळी यांना उमेदवारी दिली होती; परंतु माळी यांना ४०६७ मतांपर्यंत मजल मारता आलेली होती.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूकCommunist Party of India (markjhista)कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया (मार्क्झिस्ट)AAPआप