शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
3
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
4
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
6
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
7
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
8
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
9
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
10
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
11
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
12
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
13
‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय
14
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...
15
मलिकांवरील गुन्ह्याच्या तपासाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
16
मनसेच्या पराभूत उमेदवारांना राज ठाकरेंनी दिली उमेद; अडचणी समजावून घेत साधला संवाद
17
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
18
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
19
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...

सोशल मीडिया वापरताना केवायसी हवीच : सचिन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 12:38 PM

ओझर : सायबर गुन्हेगार हे सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करतात. सोशल मीडिया फोफावत चालले असताना त्यातून अनेकांची होणारी फसवणूक लक्षात घेता त्याला सुद्धा केवायसीची तितकीच गरज असून त्यामुळे खोट्या नावाचा वापर करून हॅकिंग व फसवणुक करणाऱ्यांना आळा बसेल. तसेच भविष्यात होणारा मोठा दुष्परिणाम टाळता येईल असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.

ओझर : सायबर गुन्हेगार हे सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळ करतात. सोशल मीडिया फोफावत चालले असताना त्यातून अनेकांची होणारी फसवणूक लक्षात घेता त्याला सुद्धा केवायसीची तितकीच गरज असून त्यामुळे खोट्या नावाचा वापर करून हॅकिंग व फसवणुक करणाऱ्यांना आळा बसेल. तसेच भविष्यात होणारा मोठा दुष्परिणाम टाळता येईल असे प्रतिपादन नाशिकचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केले.नाशिक बार असोसिएशनच्या वतीने सायबर क्राईम बाबत विविध प्रकार आणि प्रसार बाबत आयोजित चर्चा सत्रात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला अध्यक्ष ॲड नितीन ठाकरे यांनी पाटील यांचे स्वागत केले.प्रस्ताविक ऍड.जालिंदर ताडगे यांनी केले. सचिन पाटील यांनी वाढत्या ऑनलाइन वापरामुळे दररोज ऑनलाइन गुन्हे आणि फसवणूकीबाबत विविध मुद्यांवर प्रकाश टाकत माहिती दिली.देवाने जरी विचारला तरी फोन वर आपला पिन नंबर द्यायचा नाही. येणाऱ्या काळात प्रगत तंत्रज्ञान विकसित होऊन गाड्या व इतर उपकरणं सुद्धा इंटरनेट वर चालणार आहे. त्यादृष्टीनं भविष्यातील धोके आताच लक्षात घेऊन सतर्क राहा. फिजिकल बॅरीयर्स भविष्यात राहणार नाही. गुन्हेगार हे सायकॉलॉजीतील अत्यन्त हुशार असतात. विविध ऍप्लिकेशन डाउनलोड करताना वापरकर्त्याने हुशारीने राहून परवानगी द्यायची. मॅट्रिमोनिअल फ्रॉड देखील मोठ्या प्रमाणात फोफावत चालले आहे.त्यामुळे सर्वांनीच सतर्कता बाळगून इंटरनेट गुन्ह्यातून अलिप्त राहण्याचे देखील त्यांनी सांगितले.भविष्यात घडणारे सायबर गुन्हे हे अनेक पटींनी वाढणार असून त्यामुळे ऑनलाइन बाबतीत अनेक विषयांवर सखोल माहिती त्यांनी दिली.यावेळी नवीन सनद घेतलेल्या वकिलांचे स्वागत करण्यात आले व त्यांना साहित्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी शहर जिल्ह्यातून दोनशे वकील सहभागी झाले होते.यावेळी जयंत जायभावे,शरद गायधनी,संजय गीते,अविनाश भिडे,सोनल कदम,कमलेश पाळेकर,महेश लोहिते,शरद मोगल,हर्षल केंगे आदींसह वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.------------------ऑनलाइन काय काळजी घ्यावी:कोणत्याही प्रकारची ऑनलाइन फसवणूक झाल्याक्षणी त्वरित बँकेत जाऊन तक्रार पोलीस ठाणे गाठून त्याची प्रत द्यायची शिवाय सायबर पोलीस, स्थानिक पोलीस ठाणे,पोलीस अधीक्षक कार्यालयाला प्रत मेल करावी. सर्वच प्रकारचे पिन सतत बदलत राहणे, ज्या वेबसाईट वरून बँकेचे व्यवहार करतात ते सुरक्षित आहे का याची खातरजमा होणे गरजेचे आहे. वैयक्तिक वायफाय वापरताना सर्वांना ऍक्सेस होईल असे करु नये.------------------राज्यात पहिलाच उपक्रम:पोलीस आणि वकील संघ यांनी एकत्र येऊन प्रगत होणाऱ्या इंटरनेटमुळे त्याचे होणारे परिणाम यावर जनजागृती केली. पाटील यांनी देखील भारतातील मुख्य सायबर घटना व त्याचा केलेला पर्दाफाश याचे अनेक दाखले देत सतर्कता कशी बाळगावी यावर भाष्य केले.त्यामुळे नवोदित वकिलांना त्यांच्या करिअर मध्ये येणाऱ्या अडचणींसाठी सदर सत्र उपयोगी राहील असा विश्वास वकील संघाने व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिक