पुण्याच्या टाटा मोटर्स इंजिनिअरिंग रिसर्च सेंटरमध्ये मागील दोन वर्षांपासून नोकरीस असलेला श्रेयस हा नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आपल्या बुलेट दुचाकीने (एम.एच.१५जीझेड ००२०) जाण्यासाठी निघाला होता. यावेळी चाकण-तळेगाव रस्त्यावर इंदुरी गावाजवळील बायपास वळणावर विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव खासगी बसने (एमएच १४ सी.डब्ल्यू ४०५३) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत श्रेयस गंभीररीत्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला, अशी माहिती तळेगाव दाभाडी पोलिसांनी दिली. दरम्यान, बसचालक संशयित महादेव लोंढे (रा. इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून रात्री उशिरापर्यंत त्याचा पोलीस शोध घेत होते.
त्याच्या मृत्यूची वार्ता शहरात येताच इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली. शहरातील शिवसेनेचे विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गायकर यांच्या निवासस्थानी धाव घेतली होती. श्रेयसच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. श्रेयसच्या मृतदेहावर रात्री नाशिक अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुणे ग्रामीणमधील तळेगाव दाभाडी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
060921\06nsk_49_06092021_13.jpg~060921\06nsk_50_06092021_13.jpg
गायकर~श्रेयस