नाशिक : ‘फे्रण्डशीप डे’चे खरे आकर्षण हे युवक-युवतींना अधिक असते. यादिवशी प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ‘फे्रण्डशीप डे’ रविवारी येत असला तरी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी हा दिवस दुसºया दिवशी साजरा करतात. यंदा ‘फे्रण्डशीप डे’ निमित्ताने बाजारात दाखल झालेल्या नव्या स्टाइल फे्रण्डशीप बॅण्डसोबत गिफ्ट खरेदीला तरुणाईची पसंती मिळतेय. यामध्ये मित्र-मैत्रिणींचा फोटो छपाई करून तयार केलेले बॅण्ड, लेदर ब्रेसलेट, स्टिल ब्रेसलेटचे फे्रण्डशीप बॅण्डतरुणाईचे आकर्षण ठरत आहे. यासोबतच दरवर्षीप्रमाणे कापडी फे्रण्डशीप बॅण्डलादेखील तरुणाईची पसंती मिळत आहे. यंदा आपल्या मित्र-मैत्रिणींचे फोटो छपाई करून तयार करण्यात आलेल्या रबरी बॅण्डच्या सॅशला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसूून येत आहे. या नव्या सॅशला तरु णांची मोठी मागणी आहे.सोशल मीडियावरही ‘फ्रेण्डशिप डे’ची हवा४सोशल मीडियावर विविध प्रकारचे डे, उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे दोन दिवसांवर आलेल्या ‘फ्रेण्डशिप डे’चे वारे आताच सोशल मीडियावरही वाहू लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. अनेक जण आपल्या मित्र-मैत्रिणींना वेगवेगळे मैत्रीचे संदेश पाठवून एकमेकांना शुभेच्छा देत आहे.
तरुणाईला ‘फ्रेण्डशिप डे’चे लागले वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 1:47 AM
‘फे्रण्डशीप डे’चे खरे आकर्षण हे युवक-युवतींना अधिक असते. यादिवशी प्रत्येक शाळा, महाविद्यालयांत हा दिवस मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. ‘फे्रण्डशीप डे’ रविवारी येत असला तरी शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी हा दिवस दुसºया दिवशी साजरा करतात.
ठळक मुद्देबाजारपेठ सज्ज : मैत्रभावना व्यक्त करण्यासाठी अनेक भेटवस्तूंनी सजली बाजारपेठ