शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
2
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
3
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
4
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
5
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
7
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
9
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
10
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
11
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
12
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
13
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
14
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
15
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
17
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
18
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
19
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
20
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...

वीज कोसळून आंबेवाडीत तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2018 1:33 AM

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.

नाशिक : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदलेल्या मान्सूनपूर्व वातावरणामुळे वादळी वारा, वीज कोसळून घडलेल्या दुर्घटनेत इगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी येथील दशरथ धोंडू ढवळे हा २७ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला. जिल्ह्यातील अन्य भागात वादळी पावसामुळे पोल्ट्री फार्म, जनावरांचे गोठे, घरांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले, शिवाय ठिकठिकाणी वीज कोसळण्याची घटना घडल्याने जनावरे दगावली आहेत. प्रशासनाने महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून, त्यानंतर नुकसानीचा अंदाज बांधता येणार आहे.शुक्रवारी दुपारनंतर सिन्नर, वावी, येवला तालुक्यात पावसाने धूळधाण उडवली. वादळी वारा व विजेचा कडकडाट करीत कोसळलेल्या पावसाने मोठे नुकसान केले. सिन्नर तालुक्यातील शहा येथे ३२ घरांची पडझड होऊन ग्रामपंचायतीचे सभागृहाचे तसेच दोन कांदा चाळीचे शेड उडून गेले.देवपूर येथे २१ घरांची किरकोळ पडझड झाली व वीज कोसळून एक बैल व दोन वासरू मयत झाले. चार पोल्ट्री शेड जोरदार वादळात जमीनदोस्त झाले. वावी येथेही २६ घरांची किरकोळ पडझड तर नांदूरशिंगोटे येथे २२ घरांची पडझड व ४ कांदा चाळीचे नुकसान झाले. पांढुर्ली येथे १५ घरे व १४ गोठ्यांची पडझड तर ७ शेडनेटचे नुकसान झाले. सिन्नर तालुक्यात शनिवारी दुसºया दिवशीही पाऊस व वादळी वाºयाने धुळवड येथील ७ ते ८ घरांचे नुकसान झाले तसेच निवृत्ती रामनाथ आव्हाड यांचे घर कोसळून घरातील चार व्यक्ती गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारार्थ संगमनेर येथे दाखल करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथे वीज पडून शेतात बांधून ठेवलेला गोºहा मयत झाला तर रातीर येथे पाचटाचे झाप असलेल्या घरावर वीज कोसळून घराला आग लागली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कळवण तालुक्यातील देवळी वणी आणि बिलवाडी गावात वादळी वाºयाने १० ते १५ घरांचे नुकसान झाले तसेच गावातील विजेचा खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. निफाड तालुक्यातील सोनगाव येथे वीज पडून शिवनाथ त्र्यंबक गावले यांची गाय मयत झाली तर वाकद येथे सखूबाई ज्ञानदेव गागरे यांचे पोल्ट्रीचे शेड वादळी वाºयात उडून गेले.(जोड आहे)जवान ठारइगतपुरी तालुक्यातील आंबेवाडी शिवारात विजेचा कडकडाट करीत पावसाने हजेरी लावली. घराकडे परतणारा दशरथ धोंडू ढवळे (२७) हा तरुण झाडाखाली उभा असताना अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला. मयत दशरथ हा मुंबई महापालिकेच्या अग्रिशामक दलात नोकरीस होता. सुटीनिमित्त तो गावी परतला होता. त्याच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातNatural Calamityनैसर्गिक आपत्ती