-----------------
व्यापाऱ्याला एक लाखाला गंडविले
मालेगाव : येथील व्यापाऱ्याला फळांचे व्यापारी असल्याचे सांगत आंब्याचा ट्रक पाठवतो, त्यासाठी बँक खात्यात १ लाख १९ हजार ९९९ रुपये भरून घेणाऱ्या कर्नाटक येथील दोघा व्यापाऱ्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शेख अबरार शेख शफी यांनी फिर्याद दिली आहे. आंब्याचा ट्रक पाठवले नसल्याने व्यापाऱ्याची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार एम. टी. गायकर हे करीत आहेत.
-------------------
भांडण सोडविणाऱ्या तरुणालाच मारहाण
मालेगाव:- शहरातील सुक्राती चौकात भांडण सोडविण्याचा राग येऊन तरुणाला मारहाण करणाऱ्या आरीफ पठाण अक्रम पठाणविरुद्ध आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहम्मद इम्रान मो. युसूफ यांनी फिर्याद दिली. त्याच्या मित्रांचे भांडण सोडविण्यास गेला असता आरीफ पठाण अक्रम पठाण याने शिवीगाळ, दमदाटी व लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार डी. वाय. देवकर करीत आहेत.