लोकमत न्यूज नेटवर्कखामखेडा : मातृभुमीच्या रक्षणार्थ अहोरात्र डोळ्यात तेल घालून सिमेवर उभा राहणाऱ्या याच सैनिकांनी समाजाला जर काही मदत केली तर तो आनंद अधिक द्विगुिणत होतो याचाच प्रत्यय खामखेडा जिल्हा परिषद शाळेत शिकणाºया चेतन आहेर या चिमकुल्या विद्यार्थ्यास आला.चेतन आपले धावण्याचे कौशल्य तालुका जिल्ह्यापुढे दाखवत असतानाच त्याचे कौशल्य बघून सुटीवर आलेले खामखेडा येथील जवान रोशन बोरसे यांनी चेतन आहेरचे धावण्याचे कौशल्य अधिक वृध्दिंगत व्हावे व आपल्या गावाचा-जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा यासाठी स्पोर्ट्स बूट भेट देत प्रोत्साहन दिले आहे.खामखेडा ता. देवळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेला चेतनची घरची परिस्थिती तशी हलाकीची.. आई-वडील दिवसभर मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे स्पोर्ट्स तर काय साधा बूटही चेतनला घेऊन देणे त्यांना न झेपण्यासारखे आहे म्हणून चेतनच्या कौशल्याला आधाराची गरज होती हि गरज ओळखून सैनिक रोशन बोरसने केलेल्या मदतीमुळे चेतनचे कुटुंब भारावून गेले आहे.नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक धावण्याच्या स्पर्धेत चेतनने प्रथम क्र मांक पटकावित घवघवीत यश संपादन करत नाशिक येथे होणाºया जिल्हास्तरीय दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याची निवड झाली आहे.येत्या दोन-तीन दिवसात नाशिक येथे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार असून सरावासाठी त्याला पठाणकोट येथे सैन्यदलात कार्यरत असलेले रोशन जिभाऊ बोरसे यांनी शुभेच्छा दिल्या. चेतनला मुख्याध्यापक संगीता सूर्यवंशी, शिक्षक आबा शेवाळे, निलेश कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.यावेळी सैनिक रोशन बोरसे, काकाजी शेवाळे, तेजस गांगुर्डे, अक्षय शेवाळे, आबा शेवाळे, निलेश कदम हे उपस्थित होते.
जवानाने दिला धावपटू विद्यार्थ्याला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 6:41 PM
खामखेडा : मातृभुमीच्या रक्षणार्थ अहोरात्र डोळ्यात तेल घालून सिमेवर उभा राहणाऱ्या याच सैनिकांनी समाजाला जर काही मदत केली तर तो आनंद अधिक द्विगुिणत होतो याचाच प्रत्यय खामखेडा जिल्हा परिषद शाळेत शिकणाºया चेतन आहेर या चिमकुल्या विद्यार्थ्यास आला.
ठळक मुद्देआपल्या गावाचा-जिल्ह्याचा नावलौकिक व्हावा यासाठी स्पोर्ट्स बूट भेट देत प्रोत्साहन दिले