नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहामागील सोनवणे मळ्याजवळ रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेच्या धडकेत युवक गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला. जेलरोड साईनाथनगर येथील नितीन धनंजय पाटील (वय ४५) हा शनिवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास कारागृहामागील सोनवणे मळ्याजवळून रेल्वे रूळ ओलांडत होता. यावेळी मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वेने नितीनला धडक दिल्याने त्याचा डावा हात तुटला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली. नितीनला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रेल्वेच्या धडकेने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 01:21 IST