नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील बेजे फाट्याजवळ नाशिककडे येणारी भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. या अपघातात कारचालक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सूरज प्रकाशसिंग परदेशी (२३, रा.जेलरोड, नाशिक रोड) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज परदेशी मंगळवारी (दि.३) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्र्यंबकेश्वरहून नाशिककडे कारने (एमएच १५ डीसी ३९७२)ने मार्गस्थ होत होता. बेजे फाटा परिसरात कारवरील त्याचे नियंत्रण सुटले अन् कार उलटली. परदेशी कारमधून बाहेर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. त्यास तत्काळ ग्रामस्थांनी शासकीय रुग्णवाहिकेतून (१०८) नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.
भरधाव कार उलटल्याने तरुण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2021 1:31 AM