मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील टेहरे येथील आझाद मित्रमंडळाने गावच्या स्मशानभूमीची साफसफाई केली. स्मशानभूमीच्या बैठक ओट्यासह आवारात लावलेल्या झाडांचा किडीपासून बचाव व्हावा यासाठी स्वखर्चातून रंगरंगोटी केली. स्मशानभूमीतील दिवे व इतर सुविधांची सुधारणा केल्याने स्मशानभूमीचा कायापालट झाला आहे.टेहरेची स्मशानभूमी कचरा कुंडी बनली होती. मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढीग साचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली होती. अंत्यविधीसाठी येणाºया नागरिकांना याचा त्रास होत होता. हीच बाब लक्षात घेत आझाद मित्रमंडळाच्या व गावातील तरुणांनी स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवारी सकाळी हातात झाडू घेऊन स्मशानभूमीची साफसफाई केली.
टेहरेच्या तरुणांनी केला स्वखर्चातून स्मशानभूमीचा कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 10:40 PM