शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गावगाड्याच्या राजकारणाची तरुणांना क्रेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 6:10 PM

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.

ठळक मुद्देपुढाऱ्यांची कसब पणाला : निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न हवेत

सायखेडा : निफाड तालुक्यातील ६५ ग्रामपंचायत निवडुकीचे बिगुल वाजले असून आचारसंहिता लागू झाली आहे. प्रशासकीय कामकाज सुरु झाले आहे.गावगाड्याच्या निवडणुकीत यंदा तरुणांची वाढती क्रेज पाहता निवडणुका रंगतदार होण्याची शक्यता आहे, मात्र कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे विस्कटलेली आर्थिक घडी लक्षात घेता निवडणुका बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचं आहे, मात्र तरुणाचा वाढता सहभाग आणि पक्षीय राजकारण यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचा जोरदार धुरळाधुरळा उडणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत ही ग्रामविकासाचा कणा मानला जातो अलीकडे १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतला मोठया प्रमाणात निधी उपलब्ध होतो. शिवाय इतर विकास योजनेअंतर्गत लाखो रुपये येतात असतात त्यामुळे स्थानिक विकास योजनेत सरपंचपदाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकांकडे तरुण आकर्षित झाले असून जुन्या गाव पुढाऱ्यांना दूर सारून तरुण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे चित्र गावागावात दिसत आहे.निवडणुका झाल्या खर्चिकविधानसभा व लोकसभा निवडणुकीतील वाढता खर्च आत्ता ग्रामपंचायत निवडणुकीत जाचक ठरणार आहे. तालुक्यातील निवडणुकीतील कोटींच्या उलाढालीमुळे कार्यकर्त्याना लागलेली सवय आणि मतदारांचा वाढता खर्च ग्रामपंचायत निवडुकीत महाग ठरणार आहे.काही ग्रामपंचायतमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडुकीला लाजवेल इतका खर्च केला जातो सदस्य होण्यासाठी दहा लाख रुपये खर्च झाल्याची चर्चा निवडणुकी नंतर रंगलेली आहे त्यामुळे यंदाच्या निवडुकीत वारेमाप खर्च आणि उधळ पट्टी होणार आहेकोरोनामुळे आर्थिक संकटग्रामीण भागाचा विचार केला असता निफाड तालुका कोरोणाचा हॉस्पॉट ठरला होता यामुळे अनेक तरुण बेरोजगार झाले आणि व्यवसाय मोडकळीला आले. त्यामुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. ग्रामपंचायत स्तरावर अद्यापही करांच्या वसुलीला वेग आला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. त्याचा फटका निवडणुकीत पाहायला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.निवडणुका बिनविरोधसाठी प्रयत्न व्हावेग्रामपंचायतीचे सरपंचपद मिळवण्यासाठी अनेकदा आटापिटा केला जातो. सदस्यांची गोळाबेरीज करताना लाखो रुपये खर्च होतो. ग्रामीण विकासाचे सर्वोच्च मानाचे पद आरक्षित असल्यास उपसरपंच गावाचा गाडा हाकताना दिसतात. अनेक ठिकाणी सरपंच सदस्यांना विश्वासात न घेता कामकाजाचा गाव गाडा हाकतात. त्यामुळे गावातील निवडणूक विश्वासात घेऊन बिनविरोध होण्याची गरज आहे.

पुढाऱ्यांचा वाढता हस्तक्षेप...ज्या पक्षाकडे सर्वाधिक ग्रामपंचायती ताब्यात असतात अशा पक्षाला विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या काळात अधिक बळ मिळत असते. यामुळे तालुक्यातील पक्षीय पुढार्‍यांनी अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीत लक्ष घातल्याने निवडणुका चुरशीचा होत असतात अनेक ठिकाणी रसद देखील पुरवली जाते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तालुक्यातील पुढाऱ्यांचा हस्तक्षेप कमी व्हावा अशी मागणी होत आहे.अनेक ग्रामपंचायत निवडणुका पहात आलो आहे .अलीकडील काळातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या आणि खर्चिक होत आहे. त्यामुळे गावातील लाखो रुपये खर्च वाया जातो. गावातील जाणकारांनी पुढे येऊन निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे.- राजेंद्र मोगल, माजी सभापती, जिल्हा परिषद, नाशिक.ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी गावातील गावकी, भावकी आणि पक्षीय राजकारण या गोष्टी अडसर ठरतात. परंतु विकासाचा विचार करता तरुणांनी एकत्र निवडणुका बिनविरोध करणे काळाची गरज आहे- भाऊसाहेब कमानकर, माजी उपसरपंच, भेंडाळी.गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायत निवडणुकामध्ये खर्च करण्याची स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेतून विरोधक तयार होत आहे. इर्षा आणि संघर्ष यातून कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते, त्यामुळे निवडणुका बिनविरोध काळाची गरज आहे.- धोंडीराम रायते, उपसरपंच, शिंगवे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक