शहरं
Join us  
Trending Stories
1
हमास, हिजबुल्लाहनंतर आता हुती बंडखोरांवर इस्राइलची एअरस्ट्राईक, येमेनमधील अनेक अड्डे केले नष्ट   
2
"कोणत्याही परिस्थितीत हे सरकार उलथून टाकायचंच’’, विदर्भातून उद्धव ठाकरेंचा निर्धार
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला मल्लिकार्जुन खर्गेंना फोन, प्रकृतीची केली विचारपूस
4
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
5
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
6
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
7
पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे बिग बॉसमधून बाहेर! ९ आठवड्यांचा प्रवास संपला, सर्वांचे चेहरे पडले
8
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
9
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
10
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
11
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
13
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
14
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
15
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
16
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
17
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
18
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
19
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
20
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या

तरुणीचा मोबाइल खेचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 12:04 AM

नाशिक : पायी जात असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील मधुबन कॉलनीत घडली़

नाशिक : पायी जात असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाइल दुचाकीवरून आलेल्या संशयितांनी खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील मधुबन कॉलनीत घडली़पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तेजस्विनी धामणे (रा़ द्रोणगिरी हौसिंग सोसायटी) ही तरुणी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास मधुबन कॉलनीतील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएमसमोरून मोबाइलवर बोलत पायी जात होती. यावेळी तिच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा संशयितांनी तिच्या हातातील चौदा हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाइल चोरून नेला. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.गंजमाळच्या जुगार अड्ड्यावर छापागंजमाळ परिसरातील पंचशीलनगरमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुरुवारी (दि़ २) सायंकाळी भद्रकाली पोलिसांनी छापा टाकला़ यामध्ये तीन जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ पंचशीलनगरमध्ये असलेल्या शाळा क्रमांक ६ जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला असता संशयित इम्रान शब्बीर शेख (३०, रा. खडकाळी), शाबीर शब्बीर शेख (२९, रा. कसाई वाडा, वडाळा नाका) व श्याम गेंदालाल कुरील (३८, रा. पंचशीलनगर, गंजमाळ) हे तिघे अंदर-बाहर नावाचा जुगार खेळत होते़ त्यांच्याकडून दोन हजार १७० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले़ या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़महिलेची रोकड लंपासमहिलेच्या हातातील प्लॅस्टिक पिशवीला ब्लेड मारून त्यातील १२ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २) दुपारच्या सुमारास पंचवटीतील मार्के ट यार्ड परिसरात घडली. दिंडोरी नाक्यावरील दत्तप्रसाद सोसायटीतील रहिवासी मीना रेवर या मार्केट यार्डाजवळ लसूण खरेदी करीत होत्या़ यावेळी गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या प्लॅस्टिकच्या पिशवीतील रोकड व पासबुक चोरून नेले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :theftचोरीMobileमोबाइल