लासलगाव : अल्पवयीन युवतीवर धारदार शस्त्राने वार करून जखमी करणारा संशयित आतिष ढगे यास लासलगाव पोलिसांनी अटक करून निफाड न्यायालयाचे वरिष्ठ स्तर न्या. एस. बी. काळे यांच्या समोर हजर केले असता त्यास तीन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. टाकळी विंचूर येथील आतिष ढगे या युवकाने एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन तरु णीच्या घरात घुसून तिच्यावर चाकूने अठरा वार करून जखमी केले व नंतर स्वत:वरही वार करून घेतले होते. दोघांनाही नाशिक येथील खासगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपचारानंतर संशयित ढगे यास रु ग्णालयातून सोडून देण्यात आल्यानंतरही लासलगाव पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलेले नव्हते. यामुळे पीडित युवतीच्या आईने जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्र ार केली होती. लासलगाव पोलीस कार्यालयाचे सहायक निरीक्षक खंडेराव रंजवे, उपनिरीक्षक आर. बी. सोनवणे, हवालदार कैलास महाजन व प्रदीप राजगे यांनी रात्री उशीरा संशयितास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. निफाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे त्याची प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर निफाड येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात हजर केले.
‘त्या’ युवकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 1:12 AM