सिन्नर : तालुक्यातील चास येथील तरु णीने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.१७) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. नीता मारु ती खैरनार (२२) असे मृत तरु णीचे नाव आहे.येथील वसंत महादू आव्हाड यांच्या शेतातील विहिरीतील पाण्याचा तरु णीचा मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आला. पोलीसपाटील प्रयागा जाधव यांनी पोलीस ठाण्यास खबर दिली. विद्यापीठाचा फॉर्म भरताना चूक झाली व परीक्षेचे हॉल तिकीट मिळाले नाही या कारणाने नीता नैराशेत होती. यातून तरु णीने आत्महत्या केल्याचे समजते. नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात एम. एस्सीच्या दुसऱ्या वर्षात नीता शिक्षण घेत होती. दोडी येथील ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. नांदूरशिंगोटे पोलीस दूरक्षेत्रात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार प्रकाश गवळी, सुधाकर चव्हाणके व नवनाथ आडके हे करीत आहेत.वायरमनची आत्महत्याजळगाव : पिंप्राळ्यातील दांडेकर नगरातील रहिवासी शशिकांत माधवराव खोंडे (४०) यांनी राहत्या घरात स्लॅबच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी सात वाजता उघडकीस आली. खोंडे हे महावितरण कंपनीत वायरमन होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पत्नी भारती या बाहेरगावी गेल्या होत्या. त्या सायंकाळी घरी आल्या असता हा प्रकार लक्षात आला.याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास हेडकॉन्स्टेबल मनोज इंद्रीकर करीत आहेत.खोंडे यांच्या पश्चात पत्नी भारती, मुलगा मयूर, मंथन, आई रुख्माबाई, वडील माधवराव, भाऊ हभप मनोहर खोंडे, अन्य दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. मोठा मुलगा मयूर आयटीआयचे शिक्षण घेत आहे तर लहान मंथन नववीच्या वर्गात आहे.रविवारी सकाळी ११ वाजता खोंडे यांच्यावर पिंप्राळ्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
चास येथील तरु णीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:53 AM