सिन्नर : तालुक्यातील दातली येथे सिन्नर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत’ अभियानाची सुरूवात जिल्हा परिषद उपाध्यक्ष नयना गावित यांच्या हस्ते करण्यात आली.‘चलो पंचायत’ हे अभियान सिन्नर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन शेतकरी, तरूण व बेरोजगार युवकांच्या समस्या तसेच किसान शक्ती व युवाशक्ती कार्डद्वारे माहिती संकलित केली जाणार असल्याचे गावित यांनी सांगितले.यावेळी ज्येष्ठ नेते निवृत्तीमामा डावरे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ, सिन्नर तालुका निरीक्षक उत्तम भोसले, नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष दिनेश चोथवे, सिन्नर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष भाऊसाहेब शेळके, उपाध्यक्ष पवन मुठाळ, विष्णु आव्हाड, सरचिटणीस मंगेश कातकडे, सचिन आव्हाड, दातलीचे ऊपसरपंच ज्ञानेश्वर नागरे, माजी सरपंच पंढरीनाथ आव्हाड, विकास संस्थेचे अध्यक्ष रामदास भाबड, ऊत्तम बोडके, महेश नागरे, कमलाकर शिंदे, विष्णु चांदोरे, दौलत चांदोरे, राहुल शेळके आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
सिन्नर तालुक्यात युवक कॉँग्रेसचे ‘चलो पंचायत’ अभियानास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 5:42 PM