युवक कॉँग्रेसचे ‘रोजगार दो’ अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 05:59 PM2020-09-09T17:59:57+5:302020-09-09T18:01:00+5:30

पेठ : कोरोना संसर्ग रोगामुळे गत सहा महिन्यापासून देशातील करोडो युवकांना रोजगाराला मुकावे लागले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी पेठ तालुक्यात ‘रोजगार दो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार संदीप भोसले यांच्यामार्फत पेठ तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे.

Youth Congress's 'Rozgar Do' pride | युवक कॉँग्रेसचे ‘रोजगार दो’ अभिमान

पेठचे तहसीलदार संदीप भोसले यांना निवेदन देताना संदीप भोये, विशाल जाधव, याकूब शेख, राहुल चौधरी, विलास जाधव, हेमराज भोये, यशवंत गवळी आदी.

googlenewsNext
ठळक मुद्देपेठ : तहसीलदरांच्या माधमातून पंतप्रधानांना निवेदन

पेठ : कोरोना संसर्ग रोगामुळे गत सहा महिन्यापासून देशातील करोडो युवकांना रोजगाराला मुकावे लागले असून, आर्थिक संकटात सापडलेल्या युवकांना रोजगार मिळावा यासाठी पेठ तालुक्यात ‘रोजगार दो’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. तहसीलदार संदीप भोसले यांच्यामार्फत पेठ तालुका युवक कॉँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात अनेक छोटेमोठे उद्योगधंदे बंद झाल्याने देशभरातील करोडो युवकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. आदिवासी भागातील मजूर गावाकडे परत आल्याने त्यांच्या हाताला काम नाही. अशा परिस्थितीत शासनाने बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संदीप भोये, विशाल जाधव, याकूब शेख, राहुल चौधरी, विलास जाधव, हेमराज भोये, यशवंत गवळी, विठ्ठल पागी, सुरेश भोये, योगेश जाधव, गुलाब बठाले, निवृत्ती भोये, नारायण कामडी, छबीलदास पागी आदी उपस्थित होते.
 
Web Title: Youth Congress's 'Rozgar Do' pride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.