विरगाव : दसाणा लघुमध्यम प्रकल्पात पाय घसरून पडल्याने योगेश भाऊसाहेब आहिरे (रा.दसाणा) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरु वारी दुपारी१वाजेच्या सुमारास घडली. वीस तासांच्या अथक परिश्रमानंतर शुक्र वारी मृत योगेशचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले असून त्याच्यावरअंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.मयत योगेश भाऊसाहेब आहिरे (वय.१९) हा नाशिक येथे हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. दीपावली निमित्त सुट्ट्या असल्याने तो नुकताच आपल्या गावी आला होता. गुरु वारी (दिं.३१) दुपारी एक वाजेच्या सुमारास तो धरणावर फेरफटका मारण्यासाठी गेला होता. मात्र एक ते दीड तास उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी धरणाकडे धाव घेऊन त्याचा शोध घेतला. या वेळी धरण परिसरात त्याची एक चप्पल आढळून आल्याने योगेश पाय घसरून धरणात पडल्याची शंका व्यक्त करण्यात आली. सदर घटनेची माहिती पोलीस पाटील कांतीलाल सोनवणे यांनी तालुका पोलीस प्रशासनास दिल्यानंतर पोलीस दलाकडून तात्काळ धरण परिसरात शोधमोहिमेस सुरु वात करण्यात आली.गावपरिसरातील पट्टीच्या पोहणाऱ्यांनी गुरु वारी रात्री उशिरापर्यंत पाण्यात उतरून योगेशचा शोध घेतला असता त्यांना अपयश आले. शुक्र वारी सकाळी लोहणेर येथील काही युवकांनी पाण्यात उतरून योगेशचा शोध घेतला. अखेर तब्बल वीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी बारा वाजेच्या सुमारास योगेशचा मृतदेह शोधून काढण्यात प्रशासनाला यश आले.याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.**या लघुमध्यम प्रकल्पात पाय घसरून पडण्याची वर्षभरात ही दुसरी घटना घडली असून यात याच गावातील दोन तरु ण युवकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऐन दिवाळीच्या कालावधीत ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.(01विरगाव योगेश आहिरे)
दसाणा लघु प्रकल्पात पाय घसरून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 5:30 PM
विरगाव : दसाणा लघुमध्यम प्रकल्पात पाय घसरून पडल्याने योगेश भाऊसाहेब आहिरे (रा.दसाणा) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरु वारी दुपारी१वाजेच्या सुमारास घडली. वीस तासांच्या अथक परिश्रमानंतर शुक्र वारी मृत योगेशचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आले असून त्याच्यावरअंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देशुक्र वारी सकाळी लोहणेर येथील काही युवकांनी पाण्यात उतरून योगेशचा शोध घेतला. अखेर तब्बल वीस तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी बारा वाजेच्या सुमारास योगेशचा मृतदेह शोधून काढण्यात प्रशासनाला यश आले.