सुरगाणा : पिण्याचे पाणी आणण्यासाठी मोटरसायकलने जात असताना वीजवाहिनी अंगावर पडून युवक जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या बरोबर असलेल्या चुलत भावाचे प्राण वाचले आहे. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील माणी येथे बुधवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. विजय कहांडोळे असे मृताचे नाव आहे.विजय रमेश कहांडोळे (२०) व योगेश होनाजी कहांडोळे (१७) हे दोघे सख्खे चुलत भाऊ पिण्याचे पाणी आणण्यासाठी जवळच असलेल्या आश्रमशाळेजवळील हातपंपावर मोटारसायकलने जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेला विजेचा खांब कोसळल्याने विद्युतप्रवाह सुरू असलेल्या वीजवाहिनी अंगावर पडून विजय कहांडोळे जागीच मृत्यू झाला, तर त्याचा चुलत भाऊ योगेश हा विजयला वाचविण्याच्या प्रयत्नात हाताला जबर धक्का लागून जखमी झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस व उपकार्यकारी अभियंता हे घटनास्थळी दाखल झाले.विजय हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. गेल्या वर्षी बारावीत उत्तीर्ण झालेला विजय नाशिक येथील एका खासगी कंपनीत काम करत आपल्या कुटुंबाचा आधार बनला होता. तत्काळ स्वरूपातील आर्थिक मदत त्वरित दिली जाणार आहे. विद्युत निरीक्षक भेट देऊन घटनेचा अहवाल कंपनीकडे सादर करतील. त्यानुसार कुटुंबास आर्थिक मदत दिली जाईल.- ए.आर. झोले, उपकार्यकारी अभियंता, सुरगाणा
वीजवाहिनी अंगावर पडून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 8:52 PM
सुरगाणा : पिण्याचे पाणी आणण्यासाठी मोटरसायकलने जात असताना वीजवाहिनी अंगावर पडून युवक जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या बरोबर असलेल्या चुलत भावाचे प्राण वाचले आहे. ही दुर्दैवी घटना तालुक्यातील माणी येथे बुधवारी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. विजय कहांडोळे असे मृताचे नाव आहे.
ठळक मुद्देमाणी येथील घटना : पिण्याचे पाणी आणण्यासाठी निघाल्यानंतर घटना