सातपूर : गेल्या दोन महिन्यांपासून सलून व्यावसायिकांची दुकाने बंद असल्याने नाभिक समाजातील कारागिरांवर उपासमारीची वेळ आली आहे. पश्चिम मतदार संघातील नाभिक कारागिरांना युवा ऊर्जा फाऊंडेशनच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मागील वर्षीदेखील लॉकडाऊनमुळे नाभिक समाजातील कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. तशीच वेळ आताही आली आहे. सामाजिक बांधीलकी जोपासत सातपूर परिसर, सिडको परिसर, इंदिरानगर परिसर या भागातील नाभिक समाजबांधवांना नगरसेवक दिनकर पाटील, युवा ऊर्जा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांच्या माध्यमातून अकरा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. मागील वर्षीदेखील अशाचप्रकारे मदत देण्यात आली होती. संकटात मदतीसाठी धावून आलेल्या नगरसेवक दिनकर पाटील यांचे नाभिक समाजाच्या वतीने ऋण व्यक्त करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका लता पाटील, सह्याद्री शिवस्वराज्य संस्थेचे अध्यक्ष संदीप तांबे, गोकुळ इन्फ्रास्ट्रक्चरचे यश कटाळे, नाना वाघ, अरुण सैंदाने, राजेंद्र सोनवणे, ज्ञानेश्वर बोराडे, दीपक निर्वाण आदींसह नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
फोटो :- नाभिक समाजबांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना युवा ऊर्जा फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील समवेत नगरसेवक दिनकर पाटील, यश कटाळे, संदीप तांबे, नाना वाघ, दीपक निर्वाण आदी.