नाशिक : सुरगाणा तालुक्यातील पांगारणे जवळील गोंदुणे येथील प्रकाश नानू गावित (वय २९) या युवकाचे दि. २८ आॅगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास त्रिफुलीवरून अपहरण करण्यात आले. मात्र, सदर युवकाला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करून घेण्यात यश आले. याबाबत पोलीस ठाण्यात सदर युवकाने फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांकडे दाखल फिर्यादीत म्हटले आहे की, प्रकाश गावित हा दि.२८ आॅगस्ट रोजी उंबरठाण येथून रात्री आठ वाजेच्या दरम्यान दुचाकीवरु न गोंदुणे येथे जात होता. पांगारणे येथील त्रिफुलीवर एका तवेरा गाडीत बसलेल्या आठ अज्ञात इसमांनी त्याला रस्त्यात थांबवले आणि ‘आम्ही स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आहोत, तु दमणची दारू गैरमार्गाने वाहतूक करतोस, चल लगेच गाडीत बस’असे सांगून गाडीत बसवले. तेथून उंबरठाण मार्गे सुर्यगड येथे आणुन बेदम मारहाण केली. नंतर सुरगाणा येथे घेऊन गेले. तद्नंतर प्रकाशचा भाऊ दिनेश गावित यास भ्रमणध्वनी करु न ‘तुझा भाऊ आमच्या ताब्यात आहे. तुम्हाला जिवंत पाहिजे असेल तर आताच्या आताच दोन लाख रु पये सुरगाणा येथील पेट्रोल पंपाजवळ घेऊन या’ असे सांगितले. घाबरलेल्या दिनेशने रात्री गावातील नागरिकांकडून पैसे जमवून साठ हजार रु पये संबंधित अपहरणकर्त्यांना आणून दिले. खरच पैसे आणले काय, हे पाहायला गाडीतील सर्वजण खाली उतरु न दुचाकीजवळ गेले असता हीच संधी साधून प्रकाशने तेथून पळ काढला. सदर अपहरणनाट्य पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होते. त्यामधील एका युवकाला प्रकाश ओळखत असून त्याचेवर काही गुन्हेही दाखल आहेत. त्याच्या सोबतीला सचिन, डावू अशी नावे अपहरणकर्ते घेत होते. दरम्यान, हा सर्व प्रकार घडल्यानंतर प्रकाशचा भाऊ लाशा गावित हा मुंबईत कोकण परिक्षेत्रात पोलीस खात्यात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करीत असल्याने तो आल्यानंतर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.आरोपींना तात्काळ अटक करुअपहरणकर्ते संशयितांचा तपास सुरू असुन आरोपींना तात्काळ अटक करु न कठोर कारवाई करण्यात येईल. तालुक्यात गुंडगिरी कदापिही खपवून घेतली जाणार नाही. कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाला बळी न पडता कठोर कारवाई केली जाईल. पोलिस नियमानुसार गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.सुनिल खरे, पोलीस निरीक्षक, सुरगाणा.
अपहरणकर्त्यांच्या तावडीतून युवकाचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 4:11 PM
दोन लाखांची खंडणी : सुरगाणा पोलिसात गुन्हा दाखल
ठळक मुद्देयुवकाचे दि. २८ आॅगस्ट रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास त्रिफुलीवरून अपहरण करण्यात आले