सिन्नर तालुक्यातील देशवंडी गावातील दगड्या मळ्यात शनिवारी (दि. ५) सकाळी विष्णू पंडित कापडी यांच्या विहिरीत मोर पडल्याचे आढळून आले. सदर विहीर १७ ते १८ फूट पाण्याने भरलेली असल्याने एकट्याला जिवंत मोराला बाहेर काढता येत नसल्याचे बघून त्यांनी सरपंच दत्ताराम डोमाडे यांना माहिती दिली. तसेच शेजारील शेतकरी यादव कापडी, सोपान कापडी, योगेश विष्णू कापडी, सोमनाथ आव्हाड, शरद कापडी, सचिन कापडी, गणेश कापडी आदी तरुणांच्या मदतीने विहिरीत उतरून सदर मोराला विहिरीच्या बाहेर काढले. मोर कुठे जखमी नसल्याचे बघून त्यास नंतर दगड्या मळ्यातील वन विभागाच्या हद्दीत सोडून देण्यात आले. दरम्यान, देशवंडी, जायगाव, वडझिरे परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोरांसह अन्य पक्षी, प्राण्यांचा वावर वाढला आहे. वनविभागाच्या जंगलात पाणी मिळत नसल्याने मोर पाणी पिण्यासाठी येत असल्याचे सांगितले जात आहे.
फोटो - ०५ देशवंडी पिकॉक
सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विहिरीत पडलेल्या मोरास बाहेर काढून जीवदान दिले. या वेळी सरपंच दत्ताराम डोमाडे, जीवन कापडी, यादव कापडी, योगेश विष्णू कापडी, सोमनाथ आव्हाड, शरद कापडी, सचिन कापडी, गणेश कापडी आदी.
===Photopath===
050621\05nsk_11_05062021_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ देशवंडी पिकॉकसिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे विहिरीत पडलेल्या मोरास बाहेर काढून जिवदान दिले. यावेळी सरपंच दत्ताराम डोमाडे,जिवन कापडी, यादव कापडी,योगेश विष्णू कापडी,सोमनाथ आव्हाड,शरद कापडी,सचिन कापडी,गणेश कापडी आदी.