अखेर उपचार मिळण्यासाठी उशीर होत गेल्यामुळे अनिल जाधव या तरुणाचा नाहक बळी गेल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
-------------------------------------------------------------------------------
बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
चांदवड : चालू खरीप हंगामासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद इत्यादी बियाणे पन्नास टक्के अनुदानावर उपलब्ध होणार असून, शेतकरी १५ मेपर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे यांनी केले आहे.राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर वैयिक्तक शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करु न देण्यात आली आहे.
---------------------------------------------------------------------------------
चांदवडच्या आठवडेबाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
चांदवड : येथे सोमवार दि. १० मे रोजी सकाळपासून आठवडेबाजार भरण्यास परवानगी नसतानाही व्यापारी, शेतकरी, भाजीविक्रेते, फळ विक्रेत्यांनी बाजारात सकाळी सकाळी दुकाने थाटली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. चांदवड नगरपरिषद व पोलिसांनी अकरा वाजेनंतर सर्वच दुकाने उठविली. काही शेतकरी, व्यापारी हे नगरपरिषद कर्मचाऱ्यांशी अरेरावी करीत होते. सद्य परिस्थितीत तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या बऱ्यापैकी घटत असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या आठ महिन्यांत दि. २५ एप्रिलला तालुक्यातील रुग्णसंख्या १,७७५ होती ती बऱ्यापैकी घटली असून, काल दि. ९ मे रोजी तालुक्यातील रुग्णसंख्या १,०४१ वर आली. प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख व तहसीलदार प्रदीप पाटील यांनी केले आहे.
----------------------------------
सुतारखेडे येथे रस्त्याच्या वादातून हाणामारी
चांदवड : तालुक्यातील सुतारखेडे येथे शेतीच्या सामूहिक रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाली. एका कुटुंबाने चांदवडला फिर्याद दिल्यानंतर दुसऱ्या कुटुंबानेही फिर्याद दिली. सुरेखा प्रशांत निकम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तुम्ही माझ्या शेतातून ये-जा करतात, तर मला तुमच्या शेतातून येण्यासाठी रस्ता द्या, असे पती प्रशांत निकम यांच्या बोलण्याचा राग घेऊन शंकर शांताराम निकम, कैलास शांताराम निकम, यांनी काठ्या व लोखंडी गजाने मारहाण करण्यास सुरुवात केली. ती सोडविण्यासाठी गेला असता, मुले गणेश व सोनू यांना व मला काठ्या-लाठ्यांनी व गजाने मारहाण केली. याबाबत तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस नाईक राजू गायकवाड करीत आहे.