कळवण : येथील नेहरू युवा केंद्र नाशिकद्वारा जय योगेश्वर बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा संमेलन कार्यक्र म येथे नुकताच झाला. या संमेलनमध्ये विविध शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. जन-धन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना, पंतप्रधान सुरक्षा बीमा योजना, पंतप्रधान जीवन ज्योती बीमा योजना, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया आदी विविध योजनांची माहिती जिल्हा युवा संमेलनमध्ये देण्यात आली.शासनाच्या योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी युवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विनीत मालपुरे यांनी केले.डॉ. कैलास खैरनार यांच्या हस्ते कार्यक्र माचे उद्घाटन झाले. रासेयो कार्यक्र म अधिकारी विक्र म साबळे, विद्यार्थी विकास अधिकारी संदीप देवरे, आर. के. भोये, संदीप पवार आदी उपस्थित होते. धीरज मालपुरे, सागर मेणे यांंनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्र म यशस्वी होण्याकरिता नेहरू युवा केंद्र, यशवंत मानखेडकर, लेखापाल सुनील पंजे, सहायक दिलीप आहेर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कळवण येथे युवा संमेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:55 PM