तालुक्यातील १०० टक्के आदिवासी गाव असलेल्या पुणेगाव येथे कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी येथील तरुणाई पुढे सरसावली आहे. गावातील; परंतु बाहेरगावी नोकरी आणि इतर व्यवसाय करणारे तरुण युवक एकत्र आले. त्यांनी कोरोना योद्धा नावाने व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावर गावातील परिस्थितीबाबत चर्चा केली, तसेच सर्व मित्र परिवाराने गावामध्ये काय उपाययोजना करता येईल, यावर विचारविनिमय करून वर्गणी जमा केली. या वर्गणीतून गावामध्ये मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. यासोबत कोरोना विषाणूसंदर्भात जनजागृती, त्याचबरोबर १८ वर्षे व त्यापेक्षा पुढील वयोगटातील सर्वांनी लस घेण्यासखठी जनजागृती केली. यावेळी गावातील जे नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत त्या रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली. यापुढे गावामध्ये सामाजिक कार्य जसे लग्न, दशक्रिया विधी, अंत्यविधी यासह इतर कार्यक्रम याठिकाणी मास्क व सॅनिटायझर पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी हिरामण गायकवाड, कैलास गायकवाड, रामदास पवार, संजय चौधरी, लखन भोये, देवीदास चौधरी, प्रवीण भोये, अशोक चौधरी, संतोष भोये, सुरेश भोये, रामू गायकवाड, रंजना भोये, पंडित भोये, सुरेश पवार, राजू भोये, प्रकाश भोये, राजू पवार, रतीलाल पवार, राहुल पवार, पोपट चौधरी, श्रीराम वाघ, प्रकाश पवार यांनी सामाजिक पुढाकार घेतला आहे.
कोट....
आमचे गाव शंभर टक्के आदिवासी गाव आहे. येथील नागरिकांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती व्यवसाय आहे. येथील बहुतांशी नागरिकांना सॅनिटायझरचा वापर कसा करावा हे माहीत नव्हते. त्यांना घरोघरी जाऊन त्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. मास्क व लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
- हिरामण गायकवाड, शिक्षक, पुणेगाव
कोट....
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही संकल्पना यशस्वी झाल्याने आम्ही तरुणांनी ‘माझे गाव, माझी जबाबदारी’ उपक्रम राबविला आहे. या उपक्रमामुळे आमच्या गावात कोरोना रुग्णवाढ घटली आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर गावांतील तरुणांनीही आपले गाव हे एक कुटुंब समजून या कुटुंबाची जबाबदारी घ्यावी.
- सुरेश पवार, पुणेगाव
फोटो - २५ पुणेगाव मास्क
पुणेगाव येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करताना गावातील तरुण.
===Photopath===
250521\25nsk_28_25052021_13.jpg
===Caption===
फोटो - २५ पुणेगाव मास्क पुणेगाव येथे मास्क व सॅनिटायझरचे वाटप करतांना गावातील तरुण