नाशिक : बॅँकॉक (थाइलॅँड) येथे सुरू असलेल्या यूथ एशियन अॅथलेटिक्स पात्रता अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची अव्वल धावपटू १५ वर्षीय ताई बामणेने मुलींच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४ मि. २५.६६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. ही कामगिरी करताना ताईने अर्जेंटिना येथे आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या यूथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केली आहे.युथ आॅलिम्पिकसाठी ही स्पर्धा महत्वाची असल्यामुळे भारताचे सर्वच धावपटू आपले सर्वस्व पणाला लावून उत्कृष्ट कामगिरी करण्याच्या तयारी होते. मुलींची मध्यम पल्लयाची १५०० मीटर धावण्याची शर्यतीकडे महाराष्टÑाच्या तमाम अॅथलेटिक्स खेळाडू आणि प्रेमींचे लक्ष लागून होते कारण या शर्यती नाशिकची ताई बामणे धावणार होती. ताई बरोबर जपान आणि चीनच्या धावपटू प्रतिस्पर्धी होत्या त्यामुळे शर्यत चुरशीची होणार हे निश्चित होते. शर्यत सुरू झाल्यानंतर जपानची युूकी कानेमिथसू, चीनची गुईपीन झेंग आणि ताई बामणे या एका मागोमाग होत्या. पहिल्या दोन फेऱ्या झाल्यानंतर जपानच्या युकीने ताईला थोडे मागे टाकले. त्यावेळी चीनची गुईपीन ताईचा पाठलाग करीत होती. या तिघींमध्ये जास्त अंतर नव्हते. शेवटीचे दोनशे मीटर बाकी असताना जपानची यूकीने आपला वेग वाढविला, त्याच वेळी ताईने सुध्दा तीचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. पण युकी एवढी पुढे गेहली होती की ताईला तीला गाठण्यात अपयश आले. युकीने ४ मिनिट २४.२१ सेकंदात तर ताईने ४ मिनिट २५.६६ सेकंदात शर्यत पूर्ण करून अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. चीनच्या गुईपीन झेंगला (४ मि. ३०.४५ से.ं) कास्यपदकावर समाधान मानवे लागले.या शर्यतीत ताई आल्या कारर्किदीतील सर्वोत्कृष्ट वेळ नोंदविली होती. एप्रिल महिन्यात झालेल्या ज्युनिअर फेडरेशन करंकड स्पर्धेत ताईने ४ मि. ३६.६१ सेकंदाची वेळ नोंदविली होती. महत्वाचे म्हणजे या शर्यतीतील पहिल्या तिन्ही धावपटूंनीअर्जेंटीना युथ आॅलिम्पिक( ४ मि. ३६.९४ से.ं) स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली होती. खेलो इंडियात प्रथमकेंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘खेलो इंडिया’ या उपक्रमांतर्गत नवी दिल्ली येथे ८०० मीटरमध्ये नाशिकची उदयोन्मुख धावपटू ताई बामणे हिने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्ण पदक पटकावले होते. संपूर्ण राज्यातून या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमधून ताईने महाराष्ट्रासाठी पदक जिंकले होते.
ताई बामणेला यूथ आॅलिम्पिकचे तिकीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 12:00 AM
नाशिक : बॅँकॉक (थाइलॅँड) येथे सुरू असलेल्या यूथ एशियन अॅथलेटिक्स पात्रता अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकची अव्वल धावपटू १५ वर्षीय ताई बामणेने मुलींच्या १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४ मि. २५.६६ सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकले. ही कामगिरी करताना ताईने अर्जेंटिना येथे आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या यूथ आॅलिम्पिक स्पर्धेसाठी आपले तिकीट निश्चित केली आहे.
ठळक मुद्देयुथ एशियन निवड चाचणी अॅथलेटिक्स स्पर्धा ४:२५.६६ सेकंदाची वेळ नोंदवून जिंकले रौप्य