येवला : मकरसंक्र ात असल्याने येवल्यातील आबाल वृद्ध आज तहान भूक विसरून पतंग उडवण्यात मग्न झाले आहेत. येवल्याचे गोल्डमॅन पंकज पारख यांचा सोन्याचा शर्ट आणि अंगावर साडेतीन किलो सोन्याचे दागिने नेहमी परिधान करण्यामुळे जगप्रसिद्ध असणारे पारख हे येवल्यातील पारंपरिक प्रत्येक सण साजरा करतात. यंदा त्यांनी खास शैलीत पतंग व दोरा असलेला सदरा शिवून घेतला आहे. त्यांनी पतंग उडवण्याचा आनंद आपल्या मित्रमंडळी सोबत घेत आहे. पतांगोत्सवाच्या निमित्ताने महिला देखील मनमुराद आनंद लुटतात.ध्वनिक्षेपकावरून,हलकडी,बंड, च्या धुणवर युवक परस्पराशी संक्र ांतीच्या शुभेच्छांची देवाण घेवाण करतात.पंतग काटली की वकाटचा होणारा जल्लोष काही वेगळीच प्रेरणा देतो. गलका होतो,जल्लोष होतो पण अगदी निकोप खिलाडूवृत्तीच्या वातावरणात प्रत्येकाच्या गच्चीवर फटाक्यांची आतषबाजी होते.संक्रांतीला पुन्हा एकदा दिवाळी साजरी होते म्हणून फाटाके विक्र ेतेही खुश असतात.अलिकडच्या गेल्या चार ते पाच वर्षात मात्र नायलॉनचा मांजा वापरण्याचे प्रमाण वाढले होते. हा मांजा तुटत नाही ताणाला जातो.या मांजामुळे अनेकांना मोठ्या संकटाना सामोरे जावे लागले आहे. तर काहीना प्राण गमवावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत.परंतु यंदा पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासन याबाबत जागृत असल्याने या नायलॉन मांज्या वापराबाबत सजगता आली आहे.
येवल्यात रंगला पतंगोत्सव...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:30 PM