येवला : धर्मांध आणि भांडवली व्यवस्था देशाच्या विकासाला घातक असून, सत्य, शांती, अहिंसा, मानवता हाच समस्त मानवाच्या विकासाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन संजय आवटे यांनी येथे आयोजिीा महिला व युवती मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.जगातील सर्वच धर्मग्रंथांचा निर्मिक पुरु ष जरी असले तरी भारतीय स्त्रिया-तरु णी याच उद्याच्या भारताच्या खऱ्या निर्मात्या आहेत यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड विश्वास ठेवला होता व स्त्री सन्मानासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामाही दिला होता, असे ते म्हणाले. खरा भारतीय समाज हा स्त्री संस्कार, शील, चारित्र्यावर उभा आहे. आधुनिक भारताची प्रगती गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या धोरण नीतीवर सुनिश्चित झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वव्यापी धोरणाने देश आधुनिकतेकडे जाऊ शकला आहे, असे आवटे म्हणाले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या कोमल वर्दे होत्या. यावेळी मान्यवर अतिथींनी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन व सुयश्री वाघ हिने भारतीय संविधानाची उद्देशिका वाचन करून कार्यक्र माचे उद्घाटन केले. मुक्ती महोत्सवचे प्रवर्तक-निमंत्रक एस.डी. शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.भाऊसाहेब गमे, प्रा.शिवाजी गायकवाड, सविता धिवर, विनता वाघ, सुनीता जाधव, ज्योती शेळके, सुरेख खळे, नूतन खरे, पुष्पा पगारे, कोमल अनप, उज्वला मढवई, रंजना पठारे, रेखा साबळे, सुजता घोडसरे, उर्मिला सोनवणे,आदी उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ग्रंथ व भारतीय संविधान उद्देशिका देऊन करण्यात आले. पाहुण्यांचा परिचय प्रा धनराज धनगर यांनी, शंकर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अशोक पगारे यांनी आभार मानले. एन के बारे, सुरेश खळे, नानासाहेब पटाईत, अशोक पगारे, सुनील खरे, बापूसाहेब वाघ, गौरव साबळे, संदेश गुंजाळ, सिद्धार्थ गुंजाळ, गौरव काळे यांच्यासह युवती-महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
येवल्यात युवती मेळावा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:45 AM
येवला : धर्मांध आणि भांडवली व्यवस्था देशाच्या विकासाला घातक असून, सत्य, शांती, अहिंसा, मानवता हाच समस्त मानवाच्या विकासाचा मार्ग आहे, असे प्रतिपादन संजय आवटे यांनी येथे आयोजिीा महिला व युवती मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
ठळक मुद्देयुवती-महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.