सटाणा : उत्तर प्रदेशसह देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला आणि युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. हाथरस येथील पीडितेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि भारतीय संविधानात बलात्काऱ्यांच्या विरोधात कठोर कायदे करावेत या मागणीसाठी सटाणा शहर व तालुक्यातील संतप्त युवक, युवती आणि महिलांनी आज बागलाण तहसील कार्यालयावर स्वयंस्फूर्तीने मूक मोर्चा काढला.येथील कै. पं. ध. पाटील चौकापासून सुरू झालेला मोर्चा मुख्य रस्त्यावरून तहसील कार्यालयावर गेला. मोर्चात शहर व तालुक्यातील युवक, महिला सहभागी झाल्या होत्या. शासन आणि बलात्काºयांच्या निषेधाचे फलक व प्रतीकात्मक तलवारी घेऊन युवती सहभागी झाल्या होत्या. तहसील आवारात मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. हाथरसमधील पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर वंदना भामरे, अक्षदा सूर्यवंशी, राधिका भांगडिया, सुयोग आहिरे, सुजित बिरारी व हर्षवर्धन सोनवणे, सुषमा सोनवणे आदींनी बलात्काराच्या घटनांचा तीव्र निषेध करीत एका रात्रीत मोठमोठे निर्णय घेणारे केंद्र सरकार बलात्कार करणाºया नराधमांच्या विरोधात कठोर कायदे का करू शकत नाही, असे प्रश्न उपस्थित केले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले.मोर्चात तृप्ती पाटील, दीपेश्वरी देवरे, ऋतुजा येवलकर, हर्षदा पाटील, करिना सोनवणे, दीपिका देवरे, ललिता सोनवणे, साक्षी आहिरे, अपूर्वा येवला, गायत्री सोनवणे, अपर्णा येवलकर, सायली सोनवणे, प्रदीप बच्छाव, अमोल बच्छाव, सुमित वाघ, वैभव सोनवणे, पिंटू महाजन, रोहित आहिरे, सागर बधान, पीयूष अंधारे, उमेश खैरनार आदींसह युवक-युवती सहभागी होते.
हाथरस घटनेच्या निषेधार्थ सटाण्यात तरुणाई रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2020 7:10 PM
सटाणा : उत्तर प्रदेशसह देशभरात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, महिला आणि युवतींमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. हाथरस येथील पीडितेवर बलात्कार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी आणि भारतीय संविधानात बलात्काऱ्यांच्या विरोधात कठोर कायदे करावेत या मागणीसाठी सटाणा शहर व तालुक्यातील संतप्त युवक, युवती आणि महिलांनी आज बागलाण तहसील कार्यालयावर स्वयंस्फूर्तीने मूक मोर्चा काढला.
ठळक मुद्देस्वयंस्फूर्तीने मूक मोर्चा : नराधमांना तत्काळ फाशी देण्याची मागणी