नाशिक : पेठ तालुक्यातील कोहरे येथील युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्त्या केल्याची घटना मंगळवारी (दि़ २२) घडली़ मयत युवकाचे नाव हेमराज गोविंद सहारे असे आहे़ मंगळवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास राहत्या घरी हेमराजने विषारी औषध सेवन केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यास तातडीने पेठ ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले़; मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले़
पेठ तालुक्यातील युवकाची आत्महत्त्या
By admin | Published: December 24, 2015 12:05 AM