घोटी : इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आंबेवाडी शिवारात एका ३० वर्षीय युवकास अज्ञात संशयितांनी अज्ञात कारणावरु न कानावर व चेहऱ्यावर हत्याराने मारहाण केल्याने तो जागीच गतप्राण झाला. या घटनेप्रकरणी घोटी पोलीसांत अज्ञात संशियतां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत युवकास मारहाण करण्याचे कारण समजु शकले नाही. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहीती अशी की, गुरुवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास आंबेवाडी शिवाराच्या हद्दीत गांवाबाहेर शिवाजी दशरथ केकरे (३०) हा युवक मृतावस्थेत पडलेला होता. त्याच्या कानावर व चेहºयावर हत्याराने वार करण्यात आले असल्याचे दिसत होते. याबाबत त्याच्या आईला व भावाला घटनेची माहीती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, या घटनेची माहीती घोटी पोलीसांना दिली.घोटी पोलीसांना या घटनेची माहीती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे व त्यांच्या पथकाने धाव घेत माहीती घेत पंचनामा केला. यावेळी श्वान पथकानेही घटनास्थळी भेट दिली. मात्र कोणतेही धागेदोरे हाती लागु शकले नाही. मयताचा भाऊ तानाजी दशरथ केकरे यांनी भावाच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात संशयितांविरोधात खुनाची फिर्याद दिली आहे. घोटी पोलीसांनी संशयितांविरोधात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.मृत शिवाजी दशरथ केकरे याच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी घोटी पोलीसांचे पथक आंबेवाडी येथे तळ ठोकुन आहेत. विभागीय पोलीस अधिकारी अरु ंधती राणे यांनीही घटनास्थळी भेट दिली व तापासकामी सूचना केल्या. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक जालींदर पळे, पोलिस निरिक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शीतल गायकवाड, भास्कर महाले, संतोष दोंदे, भास्कर शेळके हे तपास करीत आहेत.
युवकावर हत्याराचे वार झाल्याने जागीच मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 5:55 PM
घोटी : इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या आंबेवाडी शिवारात एका ३० वर्षीय युवकास अज्ञात संशयितांनी अज्ञात कारणावरु न कानावर व चेहऱ्यावर हत्याराने मारहाण केल्याने तो जागीच गतप्राण झाला.
ठळक मुद्देआंबेवाडी येथील घटना : घोटी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल