नाशिक : तपोवनात जाणाऱ्या नव्या शाही मार्गाच्या कथड्यावरून केवडीबन शिवारात गोदापात्रात नांदूरनाका परिसरातील एका युवकाने उडी मारल्याची घटना रविवारी (दि.७) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेप्रसंगी युवकासोबत असलेल्या एका युवतीनेदेखील नदीपात्रात उडी घेण्याची तयारी केली; मात्र ही बाब तेथून जाणाºया एका जागरूक रिक्षाचालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने युवतीचा हात धरून नदीकाठापासून बाजूला केल्याचे पोलिसांनी सांगितले. गोदापात्रात युवक बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, नांदूरनाका येथील युवक आदिनाथ उर्फ प्रेम विजय शिंदे (२०,रा.स्वामीसमर्थनगर) या युवकाने सायंकाळच्या सुमारास कन्नमवार पूलाजवळून शाही मार्गाच्या कथड्यावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यापाठोपाठ एक युवतीदेखील नदीत उडी घेण्याच्या तयारीत होती; मात्र सुदैवाने एका रिक्षाचालकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने रिक्षा थांबवून त्या युवतीचा हात धरून काठापासून बाजूला केल्याचे काही नागरिकांनी पोलिसांना सांगितले.दरम्यान, घटनेची माहिती अग्निशामक मुख्यालयाला मिळाली. मुख्यालयातून याबाबत तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचा ‘कॉल’ पंचवटी उपकेंद्राला दिला गेला. पंचवटी केंद्राचा बंबासह (एम.एच.१५ एबी ४०२८) एस.आर.पगार, एस.के.भालेराव, एस.पी.मेंद्रे, आय.ए.पानसरे तसेच सावरकर तरणतलावातील व्यवस्थापक हरी सोनकांबळे, सुनील दिघे, दशरथ दिघे यांना घेऊन बंबचालक जे.एम.परदेशी हे केवडीबन परिसरात तत्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाचे जवान व जलतरणपटूंच्या चमूने गोदापात्रात कन्नमवार पूलापासून तर थेट लक्ष्मीनारायण पूलापर्यंत सुमारे दीड ते पावणेदोन तास बुडालेल्या शिंदेचा शोध घेतला; मात्र गोदापात्रात पाण्याची पातळी अधिक असल्यामुळे व पाऊसही सुरू असल्याने शिंदे ‘रेस्क्यू’ पथकाच्या हाती लागला नाही. याबाबत संबंधित युवतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तिच्याकडून रात्री उशीरापर्यंत माहिती घेतली जात होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस पुढील तपास करत आहेत.
गोदापात्रात युवकाची उडी; युवतीला प्रत्यक्षदर्शीने रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2019 10:03 PM
याबाबत पोलीस व अग्निशमन दलाकडून मिळालेली माहिती अशी, नांदूरनाका येथील युवक आदिनाथ उर्फ प्रेम विजय शिंदे (२०,रा.स्वामीसमर्थनगर) या युवकाने सायंकाळच्या सुमारास कन्नमवार पूलाजवळून शाही मार्गाच्या कथड्यावरून नदीपात्रात उडी घेतली. त्यापाठोपाठ एक युवतीदेखील नदीत उडी घेण्याच्या तयारीत होती; मात्र..
ठळक मुद्देगोदापात्रात पाण्याची पातळी अधिक शिंदे ‘रेस्क्यू’ पथकाच्या हाती लागला नाही.