आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यता देऊन प्रामाणिकपणे प्रचार करीत असत. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने महिला व तरुणांना उमेदवारीची संधी दिली होती.साधारणत: २५ ते ३० वर्षांपूर्वीची गोष्ट असावी, विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती. काँग्रेस पक्षाच्या वतीने अॅड. विलास लोणारी यांना उमेदवारी मिळाल्याने तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत होते. पूर्वीच्या काळी कोणतीही निवडणूक असो कार्यकर्त्यांची फळी तयार असे. कोणत्याही कार्यकर्त्याला आमंत्रण द्यावे लागत नव्हते. सर्वात कमी वयाचा उमेदवार म्हणून नाशिकमधून लोणारी निवडून आले होते. कारण कार्यकर्ते त्यांचा अथकपणे प्रचार करीत होते. आताच्या काळात मात्र बंडखोरीचे प्रमाण खूप वाढले आहे. सर्व पक्षांत बंडखोरी करीत या पक्षातून त्या पक्षात उडी घेत आहेत. जसे काही वाहन बदलतात त्याप्रमाणे आजकाल लोक पक्ष बदलत आहेत. पूर्वीच्या काळी नेत्यांच्या शब्दांना मोल होते. वचनबद्धता पाळली जात असे. त्या काळात काँग्रेस पक्षाने अनेक महिलांना संधी दिली होती. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आमदार म्हणून कार्य केले आहे. तसेच बीडमधून केशरबाई क्षीरसागर, दाभाडीतून पुष्पाताई हिरे, सिन्नरमधून वाजेताई, नाशिकमधून शोभा बच्छाव यांनी विधानसभेत आमदार व त्यानंतर मंत्रिपददेखील भूषविले आहे. मलादेखील नाशिकमध्ये उपमहापौर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. जिल्हा बँकेचे अध्यक्षपददेखील मी भूषविले आहे. पक्षातील आणि कार्यकर्त्यांच्या बळावर महिलांना आणि तरुणांना राजकारणात संधी मिळू शकते, हे मी अनुभवातून सांगते. फक्त त्यासाठी काम करण्याची जिद्द आणि संयम हवा.-सुमनताई बागले
युवक आणि महिलांना मिळाली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 1:58 AM
आपल्या देशात लोकशाही पद्धत असल्याने दर पाच वर्षांनी निवडणुका होतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी खासदार-आमदार जरी जनतेतून निवडून आले, तरी उमेदवार हे पक्षश्रेष्ठीच ठरवितात. काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिला, त्याला सर्व स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मान्यता देऊन प्रामाणिकपणे प्रचार करीत असत. सुमारे ३० ते ४० वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षाने महिला व तरुणांना उमेदवारीची संधी दिली होती.
ठळक मुद्देआठवणीतील निवडणूक