नाशिक : बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचा संदेश पाहण्यासाठी मोबाइल मागितल्याने झालेल्या वादातून एका युवकाचा कुºहाडीने वार करून खून करण्यात आल्याची घटना गंजमाळ परिसरातील पंचशीलनगरमध्ये गुरुवारी (दि़ १०) रात्रीच्या सुमारास घडली़ विशाल प्रकाश झाल्टे (२२, रा़ ध्रुवनगर, सातपूर, सध्या रा़ पंचशीलनगर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे़ या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात संशयित कैलास शेजूळ (रा़ पंचशीलनगर) विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचशीलनगरमधील हेमंत जगताप यांच्या घरात विकास झाल्टे हा राहत होता़ झाल्टे व संशयित कैलास शेजूळ हे दोघे मित्र असून, एकाच परिसरात राहतात़ झाल्टे हा रिक्षा व मजुरीचे काम करीत असे, तर शेजूळ हा पूर्वी सुरक्षारक्षक व सध्या एका दवाखान्यात कामाला होता़ रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास झाल्टे हा शेजूळच्या घरी गेला व दरवाजा वाजवून मोबाइलची मागणी केली़ याचा राग आलेल्या शेजूळ याने घरातील कुºहाड घेऊन झाल्टेच्या डोक्यावर वार केले़कुºहाडीने वार करण्यात आलेला विशाल झाल्टे हा जागीच कोसळला़ या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजू भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगलसिंह सूर्यवंशी, गुन्हे शाखेचे कमलाकर जाधव हे घटनास्थळी पोहोचले व त्यांनी जखमी झाल्टे यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले़ या प्रकरणी पोलिसांनी संशयित शेजूळ यास अटक केली आहे़
पंचशीलनगरमध्ये युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 12:11 AM