शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

दुर्गम हरिहर गडावर युवकांची चढाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:12 AM

महाराष्टतील सर्वात अवघड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम अशा हरिहर गडावर येथील छत्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी चढाई करत निसर्ग निरीक्षण गिरिभ्रमण व गिर्यारोहणाचा थरारक अनुभव घेतला.

मनमाड : महाराष्टतील सर्वात अवघड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्गम अशा हरिहर गडावर येथील छत्रे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी चढाई करत निसर्ग निरीक्षण गिरिभ्रमण व गिर्यारोहणाचा थरारक अनुभव घेतला.  छत्रे विद्यालयातर्फे सलग तेराव्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांमध्ये गिर्यारोहणाची व गिरिभ्रमणाची आवड निमार्ण व्हावी या हेतूने हरिहर गड दुर्गभ्रमंती मोहिमेचे आयोजन क्रीडाशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होेते.  अतिशय दुर्गम श्रेणीतील हरिहर गड हा त्याच्या उभ्या चढणीच्या पायºयांसाठी प्रसिद्ध आहे. पाहताक्षणी मनात धडकी भरविणाºया या गडावर छत्रे विद्यालयाच्या सात मुली, दोन मुले, सहा शिक्षक व मनमाडमधील पाच गिरिप्रेमींनी हर्षवाडीतून दोन तासांच्या खड्या चढाईनंतर यशस्वी आरोहण करीत थरारक अनुभव घेतला. साक्षी शिंदे, प्रेरणा गायकवाड, गुंजन शिरसाठ, धनश्री बेदाडे, रश्मी खळे, सलोनी कुडाळ, आदिती बोरसे, प्रतीक पवार, ऋषिकेश हिरे या विद्यार्थ्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच दुर्गभ्रमंतीचा थरार अनुभवला. या मोहिमेत पंकज पाखले, अशोक भोये, सुमंत अंबर्डेकर, विश्राम पवार, ऋषभ शहा या शिक्षकांनी तसेच मनमाडमधील गिरिप्रेमी डॉ. भागवत दराडे, अमोल खरे, अनिल निरभवणे, नीलेश वाघ, प्रमोद अहिरे यांनी सहभागी होत दुर्गभ्रमंतीचा अनुभव घेतला.  पर्यावरणाचा दृष्टिकोन सांभाळत एक आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांनी या मोहिमेतून घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक