बुधवारी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या सभागृहात ऑनलाइन पद्धतीने स्थायी समिती सभापतीपदाची निवड घेण्यात आली. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी सूरज मांढरे उपस्थित होते. त्यांना सहायक म्हणून मनपा आयुक्त भालचंद्र गोसावी, नगरसचिव श्याम बुरकुल यांनी कामकाज पाहिले. स्थायी समिती सभापतीपदासाठी सत्ताधारी काँग्रेसचे जफर अहमद व महागठबंधन आघाडीच्या नसरीन शेख यांचे नामांकन अर्ज दाखल झाले होतेे. जिल्हाधिकारी मांढरे यांनी नामांकन अर्जांची छाननी करून दोन्हीही अर्ज वैध ठरविले. यानंतर माघारीसाठी १५ मिनिटांची वेळ देण्यात आली होती. विहित मुदतीत कोणीही माघार घेतली नसल्याने हात उंचावून मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली. प्रारंभी सत्ताधारी काँग्रेसचे जफर अहमद यांच्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यांना काँग्रेसचे अस्लम अन्सारी, विठ्ठल बर्वे, जफर अहमद, रजियाबी शेख इस्माईल, हमीदाबी मो. फारुक कुरैशी, रजियाबेगम अब्दुल मजीद, तर सेनेचे सखाराम घोडके, जिजाबाई बच्छाव, भाजपचे छाया शिंदे, दीपाली वारुळे अशा दहा स्थायीच्या सदस्यांनी मतदान केले. शेख नसरीन यांना महागठबंधन आघाडीचे नबी अहमद मो. मुस्तकीम डिग्निटी, शेख नसरीन अल्ताफ, अख्तरुन्निसा मो. सादिक, कलीम दिलावर यांनी मतदान केले. एमआयएमचे डॉ. खालीद परवेझ अनुपस्थित होते. जफर अहमद यांना दहा मते मिळाल्याने जिल्हाधिकारी मांढरे यांनी अहमद यांची सभापतीपदी निवड झाल्याची घोषणा केली. दुपारी १२ वाजता महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. सभापतीपदासाठी सेनेच्या पुष्पा गंगावणे व महागठबंधन आघाडीच्या अन्सारी आसफा मो. राशीद यांच्यात लढत झाली. नऊ सदस्यीय महिला बालकल्याण समितीच्या निवड प्रक्रियेसाठी ८ सदस्य उपस्थित होते. महागठबंधन आघाडीच्या शेख रहिमाबी शेख इस्माईल या अनुपस्थित होत्या. सभापती पदासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी महागठबंधन आघाडीच्या अन्सारी आसफा मो. राशीद यांना सय्यद शबाना सय्यद अकील, अन्सारी सादिया मुज्जमिल्ल व आसफा अन्सारी अशी केवळ तीनच मते मिळाली, तर सेनेच्या पुष्पा गंगावणे यांना रजियाबेगम अब्दुल मजीद, हमीदाबी शेख जब्बार, शबाना शेख सलीम, सुवर्णा शेलार अशी पाच मते मिळाली.
इन्फो
काँग्रेस-सेना समर्थकांचा जल्लोष
जिल्हाधिकारी मांढरे यांनी गंगावणे यांची सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित केले. या निवडीनंतर महापौर ताहेरा शेख, माजी आमदार रशीद शेख, स्थायी, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी सभापती जफर अहमद व पुष्पा गंगावणे यांचा सत्कार केला. सत्ताधारी काँग्रेस-सेनेच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला.
फोटो फाईल नेम : १८ एमएयूजी ०१ . जेपीजी
फोटो कॅप्शन : मालेगाव महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी जफर अहमद व महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी पुष्पा गंगावणे यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना महापौर ताहेरा शेख, माजी आमदार रशीद शेख, सखाराम घोडके, अस्लम अन्सारी, विठ्ठल बर्वे, जे. पी. बच्छाव आदी.
180821\18nsk_3_18082021_13.jpg
फोटो कॅप्शन बातमी सोबत दिले आहे.