शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

मालेगावी दहशत माजविणारे आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 12:25 AM

मालेगाव शहरातील आयेशानगर, पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजविणाºया पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

मालेगाव मध्य : शहरातील आयेशानगर, पवारवाडी पोलीस ठाणे हद्दीत दहशत माजविणाºया पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून पवारवाडी पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. आतापर्यंत या गुन्ह्यात १४ जणांना अटक करण्यात आली, तर दोनजण अद्याप फरार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी दिली.१ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शहरातील विविध भागात धारदार शस्त्रांच्या जोरांवर धुडगूस घालून तीन जणांना गंभीर जखमी करणाºया टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. उत्तर प्रदेशातील आझामगड जिल्ह्यातून मुख्य संशयितांसह पाच जणांना, तर भिवंडी, मालेगाव येथून एकूण १६ जणांना ताब्यात घेण्यात आले. १४ संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच संशयितांना १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दोन अल्पवयीन युवकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, या टोळीकडून चार दुचाकी, शस्त्रे जप्त करण्यात आली.१ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील जाफरनगर, नवीन वस्ती, मिल्लतनगर, आयेशानगर भागात तोंडाला कापड बांधून दुचाकीवर येत हातात तलवारी, कुºहाड, कोयता, चाकू व लाकडी दांडे घेऊन धुडगूस घालीत तीन जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पोबारा केला होता. अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी मार्गदर्शक सूचना देत संशयितांच्या शोधार्थ तपास पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली होती.उत्तर प्रदेशातून अटकपवारवाडीचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकाने ६ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील आझामगड जिल्ह्यातील सयारमिर येथून संशयित जमालुद्दीन कमालुद्दीन कुरेशी (आरीफ कुरेशी) (२२), मोहंमद अकराम मोहंमद सुलेमान (१९) (मथन चोरवा), सऊद अहमद फय्याज अहमद (२३) उर्फ सउद चोरवा, शोएब खान फिरोज खान (२१), एजाज अहमद अब्दुल समद (२०) यांना अटक केली. आझामगड न्यायालयात उभे केले असता त्यांना ट्रॉन्झिस्ट रिमांडवर घेण्यात आले.

टॅग्स :MalegaonमालेगांवCrime Newsगुन्हेगारी