जायखेडा : येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने शेतकरी संघटनेचे संस्थापक कै. शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. बाजारपेठेतील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद जोशींच्या प्रतिमेस सरपंच जयश्री बच्छाव व ज्येष्ठ नेते पंडित मोरे यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी माजी सभापती सोमनाथ ब्राह्मणकार, गंगाधर गोसावी, माजी चेअरमन अनिल अहिरे, ब्राह्मणपाडा तंटामुक्तीचे अध्यक्ष खंडेराव देवरे, स्वाभिमानी शेतकरीचे युवराज देवरे, शिवसेनेचे निंबा मोहिते, ज्येष्ठ नेते पंडित मोरे यांनी १९८० पासून शरद जोशींनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी दिलेल्या विविध लढ्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन शेतकऱ्यांना आपल्या न्याय्य हक्कासाठी लढायला शिकविणाऱ्या शरद जोशींबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.दिवंगत शरद जोशी यांनी दिलेला अमूल्य ठेवा हा सर्वांना आयुष्यभर पुरणारा आहे. ते जिवंत विद्यापीठ होते ज्यात अनेक शेतकऱ्यांची मुले सक्षम झाली, असे मत ज्येष्ठ नागरिक पंडित मोरे यांनी व्यक्त केले. (वार्ताहर)शोकसभेसाठी माजी सरपंच शांताराम अहिरे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण सोनवणे, संजय बच्छाव, पुंडलिक अहिरे, गोपीनाथ ठाकरे, नाना जगताप, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्य, गावातील ग्रामस्थ व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जायखेडा ग्रामस्थांच्या वतीने शरद जोशी यांना श्रद्धांजली
By admin | Published: December 24, 2015 12:02 AM