कळवण : बैलपोळा हा कृषी संस्कृतीमधील सर्वात मोठा सण. वर्षभर ऊन-पावसाची तमा न बाळगता बळीराजासह राबणाऱ्या सर्जा-राजाच्या ऋणांतून मुक्त होण्याचा हा सोहळा कळवण शहरासह तालुक्यातील आदिवासी, ग्रामीण भागातील सर्व शेतकरी बांधवांनी उत्साहात साजरा केला. सजवलेल्या बैलांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीला वरुणराजानेही हजेरी लावली.फटाक्यांची आतिषबाजी, ढोल -ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत पानाफुलांनी सजवलेल्या मार्गावरून सर्जा-राजाची मिरवणूक काढण्यात आली.कळवण शहरातील पगार वाड्यातील बैलजोडीला मानाचे स्थान आहे. यंदा हा मान प्रगतिशील शेतकरी रामदास पगार, मधुकर पगार, मुरलीधर पगार, भगवान पगार, सुभाष पगार, अर्जुन पगार, पांडुरंग पगार, वसंत पगार, निंबा पगार, सुरेश पगार, हरिभाऊ पगार व बाजीराव पगार यांच्या वाड्याला देण्यात आला होता. धनलक्ष्मी पतसंस्थेचे उपाध्यक्ष कृष्णा पगार, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख मोतीराम पगार, रवींद्र पगार, गौरव पगार, अभिमन पगार, संजय पगार, शरद पगार, नरेश पगार, चेतन पगार, समीर पगार आदिंच्या संकल्पनेतून या वाड्यातील युवक सदस्यांनी मिरवणूक काढण्याच्या पूर्वी शहरातील शासकीय व निमशासकीय अधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, राजकीय नेते व पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक आदि जवळपास २०१ मान्यवरांना भगवे फेटे बांधून सत्कार केला. हा सोहळा शहराचे ग्रामदैवत श्री विठोबा महाराज मंदिरात पार पडला. सत्कार सोहळ्यात तहसीलदार कैलास चावडे व कारभारी पगार यांनी मनोगत व्यक्त केले़ यानंतर उद्योजक व जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, कळवण नगरपंचायतचे गटनेते कौतिक पगार, मविप्रचे संचालक रवींद्र देवरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, श्री विठोबा महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील शिरोरे, मुरलीधर पगार, मधुकर पगार, बाबुलाल पगार, भगवान पगार, सुभाष पगार, कृष्णा पगार, माणिक पगार, देवराम पगार, हरिभाऊ पगार यांच्या उपस्थितीत सर्जा-राजाच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी संजय पगार, अभिमन पगार, रवींद्र पगार भावराव पगार, देवराम पगार, बाबुलाल पगार, मधुकर मालपुरे, अशोक जाधव, नितीन वालखडे, राजेंद्र भामरे, विजय पगार, योगेश मालपुरे, देवीदास शिंदे, भास्कर पगार, मुन्ना पगार, समीर पगार, सुनील पगार आदिंसह शेतकरी बांधव उपस्थित होते़ (वार्र्ताहर)
कळवणला सर्जा-राजाच्या ऋणमुक्तीचा सोहळा उत्साहात
By admin | Published: September 02, 2016 9:48 PM