नाशिक : जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागात राबविण्यात येणाऱ्या ८२ पदांसाठीच्या शिक्षणसेवकांच्या भरतीत काल (दि.५) ५२ उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी दिली. येथील शासकीय कन्याशाळेत या शिक्षणसेवकांच्या मुलाखती आणि कागदपत्रांची तपासणी करून त्यांना शिक्षणसेवकपदी नियुक्ती देण्यात आली. जिल्हा परिषदेत ८२ शिक्षकांच्या पदांसाठी ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून, त्या अनुषंगाने या शासकीय कन्याशाळेत भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. ८२ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी ५२ उमेदवारांना शिक्षणसेवकपदी नियुक्ती देण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांनी सांगितले. तसेच उर्वरित उमेदवारांच्या प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त दाखले, तसेच अपंग तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती संवर्गाचे प्रमाणपत्र पडताळणी करून त्यांना नियुक्ती देण्यात येणार असल्याचेही रहीम मोगल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेत ५१ शिक्षणसेवकांना नियुक्त्या (फक्त ८२ जागांसाठी राबविली भरती मोहीम
By admin | Published: February 06, 2015 1:32 AM