नाशिक : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना लॉकडाऊन काळात रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन गरजवंतांसाठी रक्त उपलब्ध करण्यासबंधी केलेल्या आवाहनानुसार नाशिक जिल्हा परिषदेत रक्तदान शिबिराचे आयोजन करुन ५७ पिशव्यांचे रक्तसंकलन करण्यात आले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्त संकलन पेढीमार्फत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात जिल्हा परिषद मुख्यालय अंतर्गत कार्यरत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य कावजी राठोड, यतींद्र पगार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, आनंद पिंगळे, इशाधिन शेळकंदे, दिपक चाटे, अतिरिक्त जिलहा आरोगय अधिकारी डॉ. दावल साळवे, डॉ. रविंद्र चौधरी, कार्यकारी अभियंता एम.एम. खैरनार, कृषी अधिकारी रमेश शिंदे, अतिरिक्त लेखा व वित्त अधिकारी शेवाळे यांच्यासह जिल्हापरिषदेच्या विविध विभागातील कर्मचा-यांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. प्रतिभा पगार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे रक्तदान शिबीर घेण्यात आले.