दिंडोरी : केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी यांचे हिट विरोधी जाचक धोरणशच्या निर्णयामुळे अखिल भारतीय व राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समनव्य समितीच्या वतीने गुरुवारी (दि.१५) विविध सार्वजनिक मागण्यासाठी राष्ट्रीय विरोधी दिन म्हणून पाळण्यात आला.उपरोक्त दिवशी जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती कार्यालये प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, पशु वैद्यकीय दवाखाने आणि जिल्हा परिषद अंतर्गत इतर विविध संर्वग कार्यालयातील कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून शासकीय कामकाज केले.दुपारी जेवणाच्या सुट्टीत तालुका महासंघ व सर्व कर्मचारी संघटनेचे तालुका पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व पंचायत समिती आवारात निदर्शने करण्यात आली. त्यानंतर तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना निवेदन देऊन राष्ट्रीय विरोधी दिन यशस्वी करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
प्रलंबित मागण्यांसंदर्भात शासनाच्या विरोधात जिल्हा परिषद कर्मचारी बांधल्या काळ्या फिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 10:57 PM
दिंडोरी : केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी यांचे हिट विरोधी जाचक धोरणशच्या निर्णयामुळे अखिल भारतीय व राज्य सरकारी जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समनव्य समितीच्या वतीने गुरुवारी (दि.१५) विविध सार्वजनिक मागण्यासाठी राष्ट्रीय विरोधी दिन म्हणून पाळण्यात आला.
ठळक मुद्देराष्ट्रीय विरोधी दिन यशस्वी करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.