ठळक मुद्देकाळ्याफिती लावून शासकीय कामकाज केले.
दिंडोरी : अखिल भारतीय व राज्य सरकार, जिल्हा परिषद, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी (दि.१५) विविध सार्वजनिक मागण्यांसाठी राष्ट्रीय विरोधी दिन म्हणून पाळण्यात आला.जिल्हा परिषद मुख्यालय , पंचायत समिती कार्यालये, प्राथमिक शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पशु वैद्यकीय दवाखाने आणि जिल्हा परिषद अंतर्गत इतर विविध संवर्ग कार्यालयातील कर्मचारी यांनी काळ्याफिती लावून शासकीय कामकाज केले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत तालुका महासंघ व सर्व कर्मचारी संघटनेचे तालुका पदाधिकारी यांचे नेतृत्वाखाली सर्व पंचायत समिती आवारात निदर्शने करून तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.