नाशिक : जिल्हा नियोजन मंडळाकडून चालू आर्थिक वर्षात विविध योजना व विकास कामांसाठी ऑक्टोबर अखेर ३६२ कोटी ९७ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, कोरोना काळातही विविध खात्यांनी दोनशे कोटींहून अधिक रुपये खर्च केले असून, खर्चाचे हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. आगामी काळात उर्वरित रक्कम खर्च करण्याचे मोठे आव्हान आहे. जिल्हा विकास योजनांसाठी दरवर्षी नियोजन मंडळाकडून सर्वसाधारण योजनांसाठी तसेच आदिवासी उपयोजनांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. साधारणत: मे महिन्यानंतर विकासकामे व योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्यानंतर नियोजन मंडळाकडून टप्पाटप्प्याने निधी वितरीत केला जातो. यंदा मार्च महिन्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने जवळपास तीन महिने शासकीय कामकाज ठप्प झाले होते. पाणीपुरवठा व आरोग्य विभाग वगळता सर्वच खात्यांचे कामकाज थंडावले होते. जून, जुलैपासून खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात होऊन विविध खात्यांनी आपले प्रस्ताव तयार करून त्यास प्रशासकीय मान्यता, स्थायी समिती व सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन निधीची मागणी केल्याने नियोजन मंडळाने तीनशे कोटी ९७ लाख ६५ हजार रुपये वितरीत केले. त्यात शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, ग्रामपंचायत, कृषी, बांधकाम व लघु पाटबंधारे विभागांचा समावेश आहे. या निधीच्या खर्चाचा आढावा घेतला असता त्यात विविध खात्यांनी आजवर ५५ टक्के निधी खर्च केल्याची बाब समोर आली आहे. सदरचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे सर्वच खात्यांनी निधी वेळेत खर्च करण्याच्या सूचना अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेला साडेतीनशे कोटी निधी प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 11:36 PM
जिल्हा नियोजन मंडळाकडून चालू आर्थिक वर्षात विविध योजना व विकास कामांसाठी ऑक्टोबर अखेर ३६२ कोटी ९७ लाख ६५ हजार रुपये जिल्हा परिषदेला प्राप्त झाले असून, कोरोना काळातही विविध खात्यांनी दोनशे कोटींहून अधिक रुपये खर्च केले असून, खर्चाचे हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे. आगामी काळात उर्वरित रक्कम खर्च करण्याचे मोठे आव्हान आहे.
ठळक मुद्दे५५ टक्के खर्च : नियोजन मंडळाकडून मिळाले पैसे