नाशिक : पत्नीस जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमीष आपल्या मित्राला दाखवून मित्रानेच ११ लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित मधुसुदन राधाकृष्ण बैरागी (४३, रा. वडनेरदुमाला) यांनी त्यांचा मित्र संशयित नितीन आनंद मेढेविरूध्द (रा. अभियंतानगर) फसवणूकीची फिर्याद दाखल केली आहे.बैरागी यांचा दुध विक्र ीचा व्यवसाय असून त्यांची पत्नी खासगी शिकवणीवर्ग चालविते. वडनेरगेट येथे दुध विक्र ी करत असताना २०१८ साली त्यांचा महाविद्यालयीन मित्र नितीन मेढे तेथे आला. त्यांच्यात ओळख झाली व पुन्हा त्यांच्यात भेटीगाठी वाढल्या. यादरम्यान, नितीनने बैरागींकडे चौकशी करताना त्यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेत नोकरी मिळवून देतो असे सांगितले. ‘साहेब माझ्या चांगल्या ओळखीचे असून त्यांचे मंत्रालयात येणे-जाणे असल्याने त्यांच्यामार्फत नोकरी मिळेल’ असे आमीष नितीनने बैरागी यांना दाखविले; मात्र त्यासाठी पैसे द्यावे लागतील असेही बैरागी यांना सांगितले. पत्नीला शिक्षकाची नोकरी मिळेल या आशेपोटी डिसेंबर २०१८पासून बैरागी यांनी नितीनला वेळोवेळी पैसे दिले. सुमारे ११ लाख १५ हजार रु पये दिल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने बैरागी यांनी नितीनकडे विचारणा केली असता त्याने टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे त्यांना दिली. शिक्षक भरतीमध्ये तुमच्या पत्नीचे नाव लागेल असे सांगत नितीनने चालढकल केली. मात्र त्यामध्येही बैरागी यांच्या पत्नीचे नाव न आल्याने मित्राकडूनच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट उपनगर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पुढील तपास उपनगर पोलीस करत आहेत.
जिल्हा परिषदेत नोकरीचे आमीष दाखवून मित्रानेच घातला ११ लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 5:31 PM
त्यामध्येही बैरागी यांच्या पत्नीचे नाव न आल्याने मित्राकडूनच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट उपनगर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे
ठळक मुद्दे जिल्हा परिषदेत शिक्षक म्हणून नोकरी लावून देण्याचे आमीष नितीनकडे विचारणा केली असता त्याने टाळाटाळ