नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी गुरुवारी (दि.२३) मतमोजणी होणार असून, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी केंद्रावर मतमोजणी होणार आहे. यातून गेल्या वीस वर्षांपासून सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी व कॉँग्रेस आघाडीची सत्ता कायम राहते, की शिवसेना, भाजपासह इतर पक्षांना सत्ता मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तालुकानिहाय मतमोजणी केद्रांची नावे अशी- बागलाण तालुक्यातील पठावे दिगर, ताहाराबाद, जायखेडा, नामपूर, वीरगाव, ठेंगोडा, ब्राम्हणगाव या गटांची मतमोजणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्यावर तहसील कार्यालय बागलाण आवार सटाणा, मालेगाव तालुक्यातील वडनेर, झोडगे, कळवाडी, रावळगाव, दाभाडी, निमगाव, सौंदाणे गटासाठी शिवाजी जिमखाना, संगमेश्वर मालेगाव; देवळा तालुक्यातील लोहणेर, उमराणे, वाखारी गटासाठी नवीन प्रशासकीय इमारत तहसील कार्यलय देवळा, कळवण तालुक्यातील खर्डेदिगर, मानूर, कनाशी, अभोणा अभोणा गटासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, सुरगाणा तालुक्यातील गौदुणे, हट्टी, भवाडा गटासाठी तहसील कार्यालय सुरगाणा; पेठ तालुक्यातील धोंडमाळ, कोहोर गटासाठी तालुका क्र ीडा संकुल आय.टी.आय. जवळ, पेठ; दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी , कसबेवणी, खेडगाव, कोचरगाव, उमराळे बु., मोहाडी गटासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिंडोरी; चांदवड तालुक्यातील दुगाव, तळेगावरोही, वडाळीभोई, वडनेरभैरव गटासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत चांदवड; नांदगाव तालुक्यातील साकोरा, न्यायडोंगरी, भालूर, जातेगाव गटासाठी तहसील कार्यालय नांदगाव, येवला तालुक्यातील पाटोदा, नगरसूल, राजापूर, अंदरसूल, मुखेड या गटासाठी तालुका क्र ीडा संकुल, येवला; निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, पालखेड, लासलगाव, विंचूर, उगाव, कसबे सुकेणे, ओझर, चांदोरी, सायखेडा, देवगाव गटासाठी कर्मवीर गणपत दादा मोरे कला, वाणज्यि विज्ञान महाविद्यालय, निफाड येथे होणार आहे. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेचा आज फैसला
By admin | Published: February 23, 2017 12:44 AM