सिन्नर : तालुक्यातील केपानगर येथे लोकवर्गणी, जिल्हा परिषद व इम्पथी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अद्ययावत इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. ६५ लाख रूपये खर्चातून डिजिटल शिक्षण देणारी यंत्रणा ही उभारली जाणार आहे.जिल्हा परिषद शाळेत पहिली ते चौथी इयत्तेपर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. १०० विद्यार्थी शाळेत शिक्षण घेतात. शाळेची इमारत मोडकळीस आल्याने नवीन इमारतीसाठी ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. लोकवर्गणी जमा करूनही पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता. ग्रामस्थांची मागणी विचारात घेऊन युवानेते उदय सांगळे यांनी जिल्हा परिषदेतून एक वर्ग खोली मंजूर केली.शाळेला इमारतीसाठी मदतीबाबत इम्पथी फाउंडेशन कडे मागणी केली होती. फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेला इमारत होण्याबाबतची गरज विचारात घेऊन तत्काळ मंजुरी दिली. चार वर्गखोल्यांचे सह स्वतंत्र कार्यालय संगणक लॅब साठी स्वतंत्र सुविधा इमारतीत असेल.इमारतीचे बांधकामही ५० टक्के पूर्ण झाले आहे. थोड्याच दिवसात ही इमारत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. अद्ययावत स्वच्छतागृह उभारले जात आहे. गावात अद्ययावत शाळा इमारत होत असल्याने पालकांकडून ग्रामस्थांच्या एकजुटीच्या प्रयत्नाचे स्वागत केले जात आहे.-------------------इम्पथी फाऊंडेशनची२२७ वी इमारतमुंबई येथील इम्पथी फाऊंडेशनने राज्यभरात विविध गावांतील जिल्हा परिषद शाळांना इमारत बांधकामा साठी मदत केली आहे. केपानगर येथील फाउंडेशनची २२७ वी इमारत आहे.फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदरेश्वरम यांचे त्यासाठी विशेष सहकार्य लाभले. संचालक शांतीलाल छेडा यांनी ग्रामस्थांना सहकार्य केले. मंदिरे उभारण्यापेक्षा ज्ञान मंदिराची गरज असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
केपानगरला साकारणार जिल्हा परिषदेची डिजिटल शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 8:29 PM